राजकारणात नेहमीच एकमेकांवर टीका करणारे नेते जेव्हा एकाच व्यासपीठावर एकत्र येतात, तेव्हा तो क्षण चर्चेचा विषय ठरतो. भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतने असाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
नवीन जिंदाल यांच्या मुलीचे लग्न
खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नापूर्वीच्या संगीत सोहळ्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. कंगना रनौतने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती स्वतः, नवीन जिंदाल तसेच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्सची तयारी करताना दिसत आहे.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)
कंगनाची इन्स्टाग्राम पोस्ट
कंगनाने फोटो शेअर करताना लिहिले, "सहकारी खासदारांसोबत काही फिल्मी क्षण. नवीन जिंदालजींच्या मुलीच्या लग्नाच्या संगीतासाठी रिहर्सल करत आहोत."
हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. कारण, या नेत्यांमध्ये राजकीय मतभेद आणि तीव्र राजकीय टीकाटिप्पणीचा इतिहास आहे. विशेषतः महुआ मोईत्रा या भाजपवर सातत्याने टीका करताना दिसतात. 2020 मध्ये कंगना रनौतला Y+ सीआरपीएफ सुरक्षा मिळाल्यावर मोईत्रा यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले होते.
(नक्की वाचा- Pune News: पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेचा आणखी एक कारनामा, दुसरा गुन्हा दाखल)
कोण आहेत नवीन जिंदाल?
उद्योगपती आणि जिंदाल स्टील अँड पॉवरचे संचालक असलेले नवीन जिंदाल यांची भारतीय राजकारणातील ओळखीचा चेहरा आहेत. त्यांनी 2004 मध्ये काँग्रेसचे खासदार म्हणून कुरुक्षेत्रमधून संसदेत प्रवेश केला. 2024 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि कुरुक्षेत्र, हरियाणा येथून खासदार म्हणून निवडून आले.