जाहिरात

2 मुलींनी एकमेकी बरोबर केलं लग्न, 'अशा'अडकल्या लग्नबंधनात

भारतात समलैंगिक विवाहाला कायद्याने मान्यता नाही.पण त्याचा काही एक परिणाम या विवाहावर झालेला नाही. त्यांनी लग्न करण्याचा निश्चय केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला.

2 मुलींनी एकमेकी बरोबर केलं लग्न, 'अशा'अडकल्या लग्नबंधनात
गुरुग्राम:

हरियाणाच्या गुरूग्रामध्ये झालेल्या एका लग्नाची चांगलीच चर्चा संपुर्ण देशभरात होत आहे. हे लग्न इतर लग्ना पेक्षा थोडं वेगळं होतं. त्याला कारणही तसेच आहे. हे लग्न दोन मुलींनी पारंपारिक पद्धतीने एकमेकींबरोबर केले. टाईम्स ऑफ इंडिया याबाबत बातमी दिली आहे. या लग्नाची सुरूवात हळदीच्या कार्यक्रमाने झाली. तर सात फेरे घेवून हा विवाह सोहळा पुर्ण झाला. लग्नात जे जे विधीहोतात ते सर्व विधी या लग्नातही केले गेले. कविता टप्पू आणि अंजू शर्मा या दोघी एकमेकींबरोबर लग्न बंधनात अडकल्या. कविताने लग्नात नवरीचा वेश परिधान केला होता तर अंजूने नवऱ्याचा पोषाख घातला होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

समलैंगिक विवाहाला मान्यता नाही 

भारतात समलैंगिक विवाहाला कायद्याने मान्यता नाही.पण त्याचा काही एक परिणाम या विवाहावर झालेला नाही. त्यांनी लग्न करण्याचा निश्चय केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. विशेष म्हणजे कविता आणि अंजूच्या लग्नात त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण सहभागी झाले होते. शिवाय मित्र परिवारानेही या लग्नाला हजेरी लावली होती. सर्व काही ठिक चालले असताना एक अडचण समोर आली. लग्नासाठी जो पुजारी येणार होता, त्याला जेव्हा समजले की हे लग्न दोन मुलींमध्ये होत आहे, तेव्हा त्याने लग्नाकडे पाठ फिरवली. मात्र काही मित्रांनी पुढाकार घेत दोन पुजाऱ्यांना लग्नासाठी बोलवले. त्यांनीच मग हा विवाह केला. 

ट्रेंडिंग बातमी - भाजी मार्केटमध्ये राडा, दोन तरूणांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

कविता अंजूच्या विवाहाची चर्चा 

समलैगिक विवाहाला आपल्या देशात मान्यता नाही. अशा विवाहांकडे समाज कोणत्या नजरेने बघतो हे सर्वश्रूत आहे. असे असतानाही या दोघींच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला. अशा लग्नावर अनेक वेळा अक्षेप घेतला जातो. शिवाय ट्रेलही केले जाते. पण या जोड्याने लग्न करून दाखवलं. शिवाय अशा ट्रेलर्सची त्यांना कोणतीच काळजी नाही असे त्यांनी दाखवून दिले आहे. त्या दोघीही लग्नानंतर खूष आहेत. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियवर व्हायरल होत आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
J & K Exit Poll : जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनी झाल्या विधानसभा निवडणुका, एक्झिट पोलचा अंदाज काय?
2 मुलींनी एकमेकी बरोबर केलं लग्न, 'अशा'अडकल्या लग्नबंधनात
Noida  retired Major General  trap  cyber criminals Digital arrest  2 crores
Next Article
हॅलोsss मी मुंबई पोलीस बोलतो, एक फोन कॉल अन् निवृत्त मेजर जनरल झाला कंगाल