जाहिरात
Story ProgressBack

भाजी मार्केटमध्ये राडा, दोन तरूणांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

व्यापाऱ्यांची कल्याण भाजी मार्केटमध्ये दादागिरी चालते असा आरोप छोट्या भाजी विक्रेत्यांनी केला आहे.

Read Time: 2 mins
भाजी मार्केटमध्ये राडा, दोन तरूणांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण:

अमजद खान 

कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजीच्या भावावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत एका तरूणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. व्यापाऱ्यांची कल्याण भाजी मार्केटमध्ये दादागिरी चालते असा आरोप छोट्या भाजी विक्रेत्यांनी केला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

सोमवारी उल्हासनगरमधील किरकोळ भाजी विक्रेते अरुण मलिया आणि सुनील मलिया हे कल्याणच्या भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी गेले होते. मोठ्या व्यापाऱ्यांकडून ते भाजी खरेदी करत होते. त्याच  वेळी भाजीचा भाव जास्त घेतला जातो. भाव कमी करावा यावरून या दोघांचा व्यापाऱ्या बरोबर शाब्दीक वाद झाला. वाद पुढे वाढत गेला. त्यानंतर इतर व्यापारीही तिथे जमा झाले. त्यांनी अचानक पणे अरूण आणि सुनील यांच्यावर एकच हल्ला चढवला. 

ट्रेंडिंग बातमी - आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाही, कोण आहेत ओम बिर्ला ज्यांनी रचला इतिहास

सीसीटीव्ही फुटेज मध्ये या दोघांना अनेक जण मारताना दिसत आहे. अरूण आणि सुनिल हे करकोळ भाजी विक्रेते आहेत. ते भाजी घेण्यासाठी कल्याणच्या मार्कटमध्ये आले होते. त्यावेळी ही घटना घडली. या मारहाणी एकाचा  हात तुटला आहे, तर दुसरा जखमी झाला आहे.  याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या दुकान मालक आणि त्याच्या साथीदारां विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या अवैध बांधकामावर हातोडा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर
भाजी मार्केटमध्ये राडा, दोन तरूणांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
A special umbrella from Chennai for Sant Tukaram Maharaj Palkhi this year
Next Article
संत तुकाराम महाराजांच्या पालखीला यंदा चेन्नईहून खास छत्री
;