जाहिरात

Minister Scandal : 'हो, माझे 5000 अफेअर्स आहेत!"; पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर बड्या मंत्र्याची निर्लज्ज कबुली

Minister Scandal : एका स्थानिक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा सर्व प्रकार समोर आणला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Minister Scandal : 'हो, माझे 5000 अफेअर्स आहेत!"; पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर बड्या मंत्र्याची निर्लज्ज कबुली
Minister Scandal : माझ्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावामंत्र्यांच्या पत्नीनं केला आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Minister Scandal : केरळमच्या राजकारणात सध्या एका खळबळजनक प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री केबी गणेश कुमार यांच्या पत्नी बिंदू मेनन यांनी त्यांच्या नवऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी त्यांच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर आपल्याकडं  याचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे असल्याचाही खळबळजनक खुलासा केला आहे. एका स्थानिक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा सर्व प्रकार समोर आणला असून यामुळे केरळमच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कोल्लम जिल्ह्यातील वलाकोम येथील आपल्या घरात ही घटना घडल्याचे बिंदू मेनन यांनी सांगितले आहे. त्यांनी म्हटले की मी माझ्या पतीला अशा स्थितीत पाहिले ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या फोनमध्ये याचे सर्व पुरावे आहेत. हे सर्व सांगताना माझ्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो याची मला कल्पना आहे, तरीही आता मला कशाचीही पर्वा नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाने आता कौटुंबिक वादातून राजकीय वळण घेतले आहे.

Latest and Breaking News on NDTV

मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांवरही गंभीर आरोप

बिंदू मेनन यांनी केवळ नवऱ्यावरच  नाही, तर त्यांच्या कर्मचाऱ्यांवरही आरोप केले आहेत. मंत्री महोदयांचा ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी देखील या सर्व प्रकारात सामील असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी असा आरोप केला की, जेव्हा मी हे सर्व पाहिले तेव्हा कर्मचाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या फोनमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अखेर कौटुंबिक सदस्य आणि भाजप नगरसेवक आर श्रीलेखा यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी पोलीस हेल्पलाइन 112 वर संपर्क साधून मदत मागितली.

(नक्की वाचा : Badlapur News: होम लोन फेडलं तरी घर होणार सील? बदलापुरातील 'या' हायप्रोफाईल सोसायटीत खळबळ! )
 

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी आले, मात्र त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा दावा बिंदू मेनन यांनी केला आहे. तक्रार करूनही पोलिसांनी अद्याप एफआयआर (FIR) नोंदवलेला नाही, असा त्यांचा आरोप आहे. यामुळे आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीडित महिलेने मदत मागूनही पोलीस गप्प का आहेत, असा सवाल आता विचारला जात आहे.

मंत्र्यांची धक्कादायक प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणावर मंत्री केबी गणेश कुमार यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वांना चकित करणारी आहे. त्यांनी हे आरोप थेट नाकारले नाहीत, उलट त्यांनी म्हटले की माझे 5000 महिलांशी संबंध आहेत. हे माझे खासगी आयुष्य आहे आणि त्यात कोणालाही दखल देण्याचा अधिकार नाही. हे सर्व आरोप आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेले राजकीय कारस्थान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच 2021 पेक्षाही मोठ्या फरकाने मी निवडून येईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना सवाल

या प्रकरणावरून आता राजकारण तापले असून विरोधी पक्षनेते वीडी सतीशन यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्र्यांच्या पत्नीने मदत मागूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कौटुंबिक वादात रस नसला तरी एका महिलेला सुरक्षा न मिळणे हे राज्यासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे.

केबी गणेश कुमार यांचा राजकीय प्रवास

केबी गणेश कुमार हे पठानापुरम विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेते देखील आहेत आणि केरळ काँग्रेसचे दिवंगत नेते के बालकृष्ण पिल्लई यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी यापूर्वी 2001-03 आणि 2011-13 मध्ये मंत्री म्हणून काम पाहिले असून 2023 मध्ये त्यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता या नवीन वादामुळे त्यांचे राजकीय भवितव्य काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com