केरळमध्ये फिरायला गेलेल्या मुंबईतील महिलेवर टॅक्सी चालकांची अरेरावी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर सरकारचा दणका

ऑनलाइन टॅक्सी बुक केल्याने त्यांना स्थानिक टॅक्सी चालकांनी अरेरावी करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर केरळ सरकारने मुन्नारमधील तीन टॅक्सी चालकांचे परवाने तात्काळ रद्द केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kerala Google Gemini AI Photo

केरळमध्ये फिरायला गेलेला मुंबईतील महिला पर्यटकाला एक विचित्र घटनेचा सामना करावा लागला. ऑनलाइन टॅक्सी बुक केल्याने स्थानिक टॅक्सी चालकांनी अरेरावी करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर केरळ सरकारने मुन्नारमधील तीन टॅक्सी चालकांचे परवाने तात्काळ रद्द केले आहेत.

पी. विजयकुमार (40), के. विनायकान आणि ए. अनिश कुमार (40) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर गैरकायदेशीर प्रतिबंध आणि धमकी दिल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले. आता त्यांचे ड्रायव्हिंग परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

या घटनेचा उल्लेख करताना केरळचे वाहतूक मंत्री के. बी. गणेश कुमार यांनी "केरळ एक सुरक्षित पर्यटन स्थळ आहे, मात्र ही घटना या प्रतिमेवर कलंक आहे," असे म्हटले. त्यांनी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही टॅक्सी चालकांचे परवाने त्वरित रद्द करण्याचे निर्देश दिले होते. ज्यावर बुधवारी तातडीने अंमलबजावणी करण्यात आली.

(नक्की वाचा- Jemimah Rodrigues: जेमिमाह रॉड्रिग्सने वांद्रे सोडून नवी मुंबईत घेतलं नवीन घर, कारण वाचून अभिमान वाटेल!)

मंत्री महोदयांनी स्पष्ट केले की, "अशा प्रकारची गुंडगिरी केरळसारख्या पुरोगामी राज्यात सहन केली जाणार नाही. कायद्याचे पालन करणाऱ्या चालकांना सरकारचा पाठिंबा आहे, पण धमकी देणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे वागणाऱ्यांवर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."

Advertisement

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या सहायक प्राध्यापिका असलेल्या जाह्नवी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मुन्नारला येथे त्या आणि त्यांचा मित्र ऑनलाइन टॅक्सीने प्रवास करत होते. त्यावेळी स्थानिक युनियनशी संबंधित टॅक्सी चालकांनी त्यांना अडवले आणि हिल स्टेशनवर ऑनलाइन टॅक्सींना परवानगी नसल्याचे सांगून धमकावले.

(नक्की वाचा-  14 लाख फॉलोअर्स, फोर्ब्सच्या यादीत स्थान... प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अनुनाय सूदचं 32 व्या वर्षी निधन)

या व्हिडिओची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली. पर्यटन मंत्री पी. ए. मोहम्मद रियास यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि पर्यटकांना त्रास दिल्याबद्दल कारवाई केली. टॅक्सी चालकांसह मदत न केल्याबद्दल आणि स्थानिक चालकांची बाजू घेतल्याबद्दल ग्रेड सब-इन्स्पेक्टर जॉर्ज कुरियन आणि सहायक सब-इन्स्पेक्टर साजू पॉलोसे या दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article