YouTuber Couple Dead : यूट्युबर जोडप्याच्या अचानक मृत्यूने खळबळ, काही तासांपूर्वीच अपलोड केलेला VIDEO

YouTuber Couple Found Dead : सेल्वराज (45) आणि प्रिया (37) असे या जोडप्याचे नाव आहे. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
The police reported that Priya's body showed signs of early decomposition.
Thiruvananthapuram:

केरळमध्ये एका यूट्यूबर जोडपं घरात मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी पती-पत्नी दोघेही घरात मृतावस्थेत आढळले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याने मृत्यूच्या काही तास आधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. ज्याच्या पार्श्वभूमीवर मल्याळम गाणे 'विदा पर्युकेनन जनम' (मृत्यूचा शेवटचा प्रवास) ऐकू येत होता. दोघांनीही मृत्यूपूर्वीच संकेत दिले होते, असा अंदाज वर्तवला जात आहे. दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सेल्वराज (45) आणि प्रिया (37) असे या जोडप्याचे नाव आहे. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा आत्महत्येच्या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत. दोघांनीही अचानक मृत्यूने शेजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. 

दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. लोकांनी सांगितले की प्रियाचे एक यूट्यूब चॅनल आहे. ज्यावर ती अनेकदा कुकिंग व्हिडिओ अपलोड करत असे. या यूट्यूब चॅनेलचे 18 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. 

आर्थिक चणचणीमुळे दोघांनी आत्महत्या केल्याने बोलले  जात आहे. शेवटच्या व्हिडीओमध्ये जोडप्याचे अनेक फोटोजचे मॉन्टेज दाखवले आहे. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी सेल्वराज हा दाखवून निरोप घेत आहेत आणि त्यांची पत्नी प्रिया त्यांच्या मागे हसताना दिसत आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  मोबाईल चोरीच्या संशयावरुन तरुणाची निर्घृण हत्या, आरोपींना तीन तासात बेड्या)

दोघांच्या मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु या जोडप्याच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, गेल्या वर्षी त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर हे जोडपे आर्थिक अडचणीत होते. पोलीस त्या बाजूनेही तपास करत आहेत.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Advertisement
Topics mentioned in this article