जाहिरात

Kerla News: Youtube पाहून नको ते केलं, स्लिम होण्याच्या नादात तरुणीचा जीव गेला; तुम्ही 'ही' चूक करु नका

Kannur Girl Death: ती अभ्यासात चांगली होती आणि नेहमीच आनंदी असायची. पण वजन कमी करण्याच्या नादात तिने भलते प्रयोग केले अन् तेच तिच्या जिवावर बेतले. 

Kerla News: Youtube पाहून नको ते केलं, स्लिम होण्याच्या नादात तरुणीचा जीव गेला;  तुम्ही 'ही' चूक करु नका

 केरळ: सध्याचे युग इंटरनेट अन् सोशल मीडियाचे युग आहे. दैनंदिन जीवनातील छोट्यामोठ्या गोष्टी अन् दिनचर्येबाबतही आपण इंटरनेटवर सर्च करुन सल्ले घेत असतो. मात्र युट्यूब, फेसबूकवरील हे सल्ले ऐकणे अनेकदा जिवावरही बेतू शकते. अशीच एक धक्कादायक घटना केरळमधून समोर आली आहे. युट्यूब पाहून डाएट प्लॅन करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  केरळच्या कन्नूरमधील कुथुपरंबा येथे एका १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. एम. श्रीनंदा असे आहे आणि ती मत्तानूर येथील पझहस्सी राजा एनएसएस कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. आता या तरुणीच्या मृत्यूचे धक्कादायक कारण समोर आले आहे. 

श्रीनंदा ही गेल्या काही दिवसांपासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होती. त्यासाठी ती युट्यूबवरील व्हिडिओ पाहून आपला डाएट प्लॅन करत होती. त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करत होती. त्यामधीलच सल्ल्यानुसार वजन कमी करण्यासाठी तिने आपले जेवनही कमी केले होते तसेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती आहारात बदल करत होती. 

( नक्की वाचा : Maharashtra Budget 2025: शेतीमध्ये AI ते मोफत वीज.. बजेटमधून बळीराजासाठी घोषणांचा पाऊस )

मात्र यामुळे तिचे अन्न सेवन खूपच कमी केले होते, ज्यामुळे त्याच्या शरीराला आवश्यक पोषण मिळत नव्हते. हळूहळू तिची तब्येत बिघडू लागली, शेवटी तिला रुग्णालयाच दाखल केले मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. जेव्हा श्रीनंदची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना ताबडतोब थलासेरी सहकारी रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

दरम्यान, श्रीनंदाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तिचे वडील अलक्कदन श्रीधरन, आई एम. श्रीजा आणि भाऊ यदुनंद यांना विश्वासच बसत नाही की त्यांची मुलगी आता या जगात नाही. ती अभ्यासात चांगली होती आणि नेहमीच आनंदी असायची. पण वजन कमी करण्याच्या नादात तिने भलते प्रयोग केले अन् तेच तिच्या जिवावर बेतले. 

Maharashtra Budget 2025 : कसा आहे राज्याचा अर्थसंकल्प? 5 मुद्यातून समजून घ्या संपूर्ण बजेट!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: