
Maharashtra Budget 2025: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार आज महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सरकारकडून आज जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्र आता थांबवणार नाही, विकास लांबणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी अनेक नव्या योजना जाहीर केल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार?
शेतकरी हा आपल्या जिवनाचा मुलाधार आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धीमतेचे धोरण राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी एआयचा वापर होईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरु करण्यात येईल.
त्याचबरबोर कालवे सुधारण्यासाठी 5000 कोटी, राज्यातील अपूर्ण सिंचनाची, प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीसाठी सुधारण्यासाठी 5 हजार कोटी रुपये किमतीची नाबार्ड अर्थसहाय्य पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत डिसेंबर 7978 कोटींची सवलत देण्यात आल्याचीही सर्वात मोठी घोषणा केली आहे. त्याचबरोबर राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर होणार आहे. पीएम आवास, पीएम जनमन, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, यशवंतराव चव्हाण वसाहत, धर्मवीर आनंद दिघे घरकुल अशा मोठ्या योजनांचा यामध्ये समावेश असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो, केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो...पुन्हा आलो,असे म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट वाचनाला सुरुवात केली. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. दावोसमध्ये 56 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले, 15 लाख 72 हजार 654 कोटींची गुंतवणूक होणार आहे. 16 लाख रोजगार निर्मिती होईल अशी आशा आहे, असे म्हणत महायुतीला दिलेल्या मतांबद्दल त्यांनी आभार मानले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world