Khan Sir Reception : प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर यांनी गुपचूप लग्न केल्यानंतर काल एका आलिशान हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. खान सरांना शुभेच्छा देण्यासाठी देशातील आणि बिहारमधील अनेक मोठे चेहरे या रिसेप्शन पार्टीत पोहोचले होते. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव देखील शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.

खान सरांनी मे महिन्यात अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले होते. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहून त्यांनी कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित केला नाही. काही काळानंतर त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासमध्ये लग्नाची माहिती दिली. देशाच्या हितासाठी विवाहसोहळा लहान ठेवणेच बरे वाटले, असं खान सर यांनी सांगितलं.

खान सरांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या प्रसंगी, खान सरांच्या पत्नी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसल्या. त्यांचा चेहरा झाकलेला असला तरी त्यांचे नाव एएस खान असे सांगितले जात आहे. परंतु त्यांची संपूर्ण ओळख अजूनही गुप्त ठेवण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world