जाहिरात

न्यूड पार्टी काय असते? 'त्या' पोस्टरमुळे देशात उडालीये खळबळ; भारतात परवानगी आहे का?

नुकतच छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक न्यूड पार्टीच्या पोस्टर प्रकरणात पोलिसांनी कारवाई करीत पाच आयोजकांना अटक केली आहे.

न्यूड पार्टी काय असते? 'त्या' पोस्टरमुळे देशात उडालीये खळबळ; भारतात परवानगी आहे का?
नवी दिल्ली:

What is Nude Party: नुकतच छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक न्यूड पार्टीच्या पोस्टर प्रकरणात पोलिसांनी कारवाई करीत पाच आयोजकांना अटक केली आहे. या न्यूड पार्टीचा (Nude Party) पोस्टर सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. अशात लोकांना याबाबत उत्सुकता वाढली आहे. न्यूड पार्टी काय असते आणि कशा प्रकारे याचं आयोजन केलं जातं? अनेकांना याबाबतचे नियम जाणून घेण्याबाबत उत्सुकता आहे.  

न्यूड पार्टी काय असते? 

न्यूड पार्टीचा अर्थ जिथं अनेकजण एकत्र येतात. हे लोक एका खास ठिकाणी भेटतात आणि कोणीही कपडे घालत नाही. निर्वस्त्र होऊन हा ग्रुप एके ठिकाणी वेळ घालवतात. येथे विविध प्रकारच्या अॅक्टिव्हिटीचं आयोजन केलं जात. अशा प्रकारे कपड्यांशिवाय एकमेकांना भेटणं नैसर्गिकपणे मोकळेपणाची भावना असल्याचं म्हटलं जातं. अनेक ठिकाणी याला सोशल किंवा कल्चरल अनुभव म्हटलं जातं. 

न्यूड पार्टीचा उद्देश आपल्या शरीराप्रती सहजता आणि आत्मविश्वास वाढविण्याचा आहे. लोकांना कोणत्याही प्रकारची भीती, लाच, संकोच किंवा सोशल जजमेंटपासून मुक्त होऊन वेळ घालवता यावा यासाठी अशा प्रकारच्या पार्टींमध्ये सहभागी होतात. काहीजण याला सोशल कनेक्शनचा मार्ग मानतात तर काही लोक याला मानसिक आणि भावनात्मक स्वातंत्र्याचं नाव देतात. 

न्यूड पार्टीचे नियम

प्रत्येक न्यूड पार्टीचे काही नियम आहेत. ज्यामुळे यात सहभागी होणारी व्यक्ती सुरक्षित आणि सहजतेचा अनुभव घेऊ शकेल. येथील प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेने येते. कोणावरही दबाव टाकून आणलं जात नाही. येथे बाहेरील लोकांना प्रवेश दिला जात नाही. पार्टीचं ठिकाणही अत्यंत सुरक्षित आणि खासगी असतं. येथील सर्व सदस्य एकमेकांशी सहजपणे वागतात. कोणीही कोणाला पाहून जज करीत नाही. येथे कॅमेरा, व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी पूर्णपणे वर्ज्य आहे. 

न्यूड पार्टीचं समर्थन करणारे लोक याला मानसिक दबाव कमी करण्याचं माध्यम मानतात. एक असं ठिकाण जिथं सोशल आणि मानसिक दबावातून मुक्त होऊन कोणत्याही जजमेंटशिवाय मोकळेपणाने जगू शकता. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये  (Nude Party in Western Culture) न्यूड पार्टीचं आयोजन केलं जातं. मात्र भारतात अशा प्रकारच्या पार्टीसाठी मंजुरी दिली जात नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com