जाहिरात

Court News: अदृश्य शक्तीमुळे 2 लेकींना संपवलं, जन्मदात्या आईचा दावा; सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निकाल!

Supreme Court News: "अदृश्य शक्तींचे" नियंत्रण म्हणून लावला जातो. कदाचित त्या महिलेला अचानक मानसिक झटका आला असेल ज्यामुळे तिने हा जघन्य गुन्हा केला असेल.

Court News: अदृश्य शक्तीमुळे 2 लेकींना संपवलं, जन्मदात्या आईचा दावा; सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निकाल!

छत्तीसगड:  छत्तीसगडमधील एका गावामध्ये जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन मुलींना लोखंडी रॉडने मारहाण करत ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. 5 जून 2015 मध्ये या घटनेत कनिष्ठ न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने या महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र सोमवारी (ता. 28) सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वाचा निकाल देत तिची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिला आहे. या खटल्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्तीसगडमधील दोन मुलींची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या जन्मदात्या आईला सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.  या प्रकरणाची सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत खंडपीठाने म्हटले की,  तपास अधिकारी साक्षीदारांच्या पुराव्यावर शस्त्र जप्त करण्यावर आणि वैद्यकीय पुराव्यांवर समाधानी असल्याचे दिसते आणि ते या कृत्यामागील हेतू तपासल्याशिवाय महिलेनेच खून केला आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तसेच ही घटना महिलेच्या त्याच घरात राहणाऱ्या नातेवाईकाने पाहिली. मात्र हत्या करणाऱ्या महिलेने गुन्हा कबूल करण्यास नकार दिला आणि असा दावा केला की तिला घटनेची काहीच माहिती नव्हती कारण तिच्यावर "कोणत्यातरी अदृश्य शक्ती"चा प्रभाव होता. महिलेचा हाच दावा या निकालाचा टर्निंग पॉईंट ठरला.

नक्की वाचा - Pahalgam attack: हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप, POK मधील दहशतवादी तळाची 'अशी' झाली स्थिती

यावेळी न्यायमूर्ती सिंह यांनी असा युक्तिवाद केला की 'अदृश्य शक्तींचा' प्रभाव ही तात्पुरती मानसिक स्थिती असू शकते. या आधारावर त्याची शिक्षा हत्येऐवजी सदोष मनुष्यवधात बदलण्यात आली. ती महिला जवळजवळ 10 वर्षे तुरुंगात असल्याने न्यायालयाने तिची सुटका करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती सिंह म्हणाले की, ग्रामीण भागात, जिथे अंधश्रद्धा खोलवर रुजलेली आहे, तिथे मानसिक समस्यांचा चुकीचा अर्थ "अदृश्य शक्तींचे" नियंत्रण म्हणून लावला जातो. कदाचित त्या महिलेला अचानक मानसिक झटका आला असेल ज्यामुळे तिने हा जघन्य गुन्हा केला असेल.

हेही वाचा: 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव