जाहिरात

L&T Chairman 90 Hour Work Remark: भारताच्या तुलनेत इतर देशांत लोक किती तास काम करतात?

L&T Chairman 90 Hour Work Remark : भारतासह अन्य कोणकोणत्या देशांमध्ये नागरिकांना किती दिवस आणि किती तास काम करावे लागते? जाणून एका क्लिकवर सर्व माहिती...

L&T Chairman 90 Hour Work Remark: भारताच्या तुलनेत इतर देशांत लोक किती तास काम करतात?
L&T Chairman 90 Hour Work Remark: कोणत्या देशात आठवड्याला किती दिवस आणि किती तास काम?

L&T Chairman 90 Hour Work Remark: लार्सन अँड टुब्रोचे (एलअँडटी) चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यामध्ये 90 तास काम करायला हवे, असे मत मांडले. त्यांच्या या विधानास सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांनीही सोशल मीडियावर विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. "घरात बसून किती वेळ तुम्ही बायकोला आणि बायको तुम्हाला पाहत बसणार? असे म्हणत ऑफिसला या आणि काम सुरू करा. रविवारी देखील काम करण्यास कचरता कामा नये", असे म्हणत त्यांनी 90 तास काम करण्याचा सल्ला दिलाय. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केलीय. 

दरम्यान भारतासह अन्य कोणत्या देशांमध्ये नागरिकांना किती दिवस आणि किती तास काम करावे लागते, याची माहिती जाणून घेऊया...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारत

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 9 वाजेपासून ते 6 संध्याकाळी वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास : अंदाजे 46.7 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी : 12-16 सार्वजनिक सुट्ट्या (प्रत्येक राज्यानुसार सुट्या बदलतात)

संयुक्त अरब अमिराती (UAE)

अधिकृतरित्या कामाचे तास : रविवार ते गुरुवार,  सकाळी 9 वाजेपासून ते 6 संध्याकाळी वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 52 तास
आठवड्यातील सुटी : शुक्रवार आणि शनिवार
वार्षिक सुटी : स्थानिक कॅलेंडरनुसार सुमारे 10 सार्वजनिक सुट्ट्या

Larsen And Toubro : घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला

(नक्की वाचा: Larsen And Toubro : घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला)

पाकिस्तान 

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 46.6 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी : जवळपास 15 सार्वजनिक सुट्ट्या

बांगलादेश

अधिकृतरित्या कामाचे तास : रविवार ते गुरुवार,  सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 46 तास
आठवड्यातील सुटी : शुक्रवार  आणि  शनिवार 
वार्षिक सुटी : जवळपास 22 सार्वजनिक सुट्ट्या

इजिप्त 

अधिकृतरित्या कामाचे तास : रविवार ते गुरुवार,  सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 45 तास
आठवड्यातील सुटी : शुक्रवार  आणि  शनिवार 
वार्षिक सुटी : जवळपास 14 सार्वजनिक सुट्ट्या

भूतान

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 54.4 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी : जवळपास 16 सार्वजनिक सुट्ट्या

नेदरलँड्स

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 31.6 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी :  10  सार्वजनिक सुट्ट्या

कॅनडा 

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 32.1 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी :  10  सार्वजनिक सुट्ट्या (प्रांतानुसार सुट्यांमध्ये बदल)

ऑस्ट्रेलिया 

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 32.3 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी :  7-10  सार्वजनिक सुट्ट्या (राज्यांनुसार सुट्यांमध्ये बदल)

न्यूझीलँड

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 8:30 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 33 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी :  11  सार्वजनिक सुट्ट्या  

अमेरिका (United States) 

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 38 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी :  10 सार्वजनिक सुट्ट्या 

ब्रिटन (United Kingdom)

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 35.9 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी :  8 सार्वजनिक सुट्ट्या 

जपान

अधिकृतरित्या कामाचे तास : सोमवार ते शुक्रवार,  सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत  
आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 36.6 तास
आठवड्यातील सुटी : शनिवार  आणि  रविवार
वार्षिक सुटी :  16  सार्वजनिक सुट्ट्या  

चीन 

आठवड्यातील कामाचे एकूण तास: अंदाजे 46.1 तास

Larsen And Toubro | 90 तास काम करा! L&T चे चेअरमन यांचा सल्ला | 90 hours a week | NDTV मराठी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com