गुड न्यूज! LIC च्या 2 नव्या स्कीम लॉन्च, विम्यासोबतच सेव्हिंग अन् 2 कोटींपर्यंत होणार फायदा

भारतीय जीवन विमा निगम म्हणजे एलआयसीने ग्राहकांसाठी दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या दोन नवीन योजनांमध्ये एलआयसी प्रोटेक्शन प्लस आणि एलआयसी विमा कवच यांचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
LIC New Scheme Latest Update
मुंबई:

LIC New Scheme Launch :  भारतीय जीवन विमा निगम म्हणजे एलआयसीने ग्राहकांसाठी दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या दोन नवीन योजनांमध्ये एलआयसी प्रोटेक्शन प्लस आणि एलआयसी विमा कवच यांचा समावेश आहे.या दोन्ही योजनांची रचना अशी करण्यात आली आहे की, पॉलिसीधारकाला विम्यासोबत बचत आणि आर्थिक सुरक्षिततेचा फायदा मिळेल.या योजनांपैकी एका योजनेत मार्केट-लिंक्ड सेव्हिंगची सुविधा मिळेल,तर दुसरी योजना पूर्णपणे लाइफ प्रोटेक्शन देते.एलआयसीच्या या दोन नवीन योजनांमधून तुम्हाला कोणते मोठे फायदे मिळतील? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

एलआयसी प्रोटेक्शन प्लस – विमा आणि बचतीचा फायदा

एलआयसी प्रोटेक्शन प्लस ही एक लिंक्ड लाइफ इन्शुरन्स योजना आहे,ज्यामध्ये पॉलिसीधारकाला लाइफ कव्हरसह गुंतवणुकीचा पर्याय मिळतो. ही योजना अशा लोकांसाठी आहे जे विम्यासोबत फंड तयार करू शकतात.

नक्की वाचा >> याड लागलं रं..! अंधेरीत स्टार अभिनेत्रीनं मध्यरात्री नको ते केलं, पोलिसांची उडाली झोप, Video व्हायरल

एलआयसी प्रोटेक्शन प्लसची वैशिष्ट्ये:

  • ही योजना 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोक घेऊ शकतात.
  • पॉलिसी कालावधी: 10, 15, 20 किंवा 25 वर्षे.
  • प्रीमियम भरण्याचा कालावधी: 5, 7, 10 किंवा 15 वर्षे.
  • वार्षिक प्रीमियमच्या किमान 5 ते 7 पट सम एश्योर्ड मिळेल.
  • टॉप-अप प्रीमियमद्वारे फंड व्हॅल्यू वाढवण्याचा पर्याय.
  • पॉलिसी सुरू झाल्यानंतर 5 वर्षांनी आंशिक पैसे काढण्याची सुविधा.
  • मॅच्युरिटीवेळी फंड व्हॅल्यू मिळेल.
  • पॉलिसीधारकाच्या मृत्यू झाल्यास नॉमिनीला सम एश्योर्डसोबत फंड व्हॅल्यू दिली जाईल.

नक्की वाचा >> शिक्षिकेनं मर्यादा ओलांडली! विद्यार्थ्यानंही केलं असं काही.., WhatsApp चॅटचा स्क्रिनशॉट होतोय व्हायरल

एलआयसी विमा कवच – 2 कोटींपर्यंत गॅरंटेड लाइफ कव्हर

एलआयसी विमा कवच ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग टर्म इन्शुरन्स योजना आहे. ही योजना अशा लोकांसाठी आहे जे गुंतवणुकीच्या त्रासाशिवाय आपल्या कुटुंबासाठी मजबूत सुरक्षा कवच तयार करू शकतात.

एलआयसी विमा कवचची वैशिष्ट्ये:

ही योजना देखील 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोक घेऊ शकतात.
मॅच्युरिटी वय: जास्तीत जास्त 100 वर्षे.
सम एश्योर्ड: 2 कोटींपर्यंत गॅरंटीड लाइफ कव्हर.
पर्याय: लेव्हल सम एश्योर्ड किंवा इन्क्रीजिंग सम एश्योर्ड.
प्रीमियम भरण्याचे प्रकार: सिंगल, लिमिटेड आणि रेग्युलर.

Advertisement