जाहिरात

शिक्षिकेनं मर्यादा ओलांडली! विद्यार्थ्यानंही केलं असं काही.., WhatsApp चॅटचा स्क्रीनशॉट होतोय व्हायरल

एका शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्यासाठी चक्क धमकीचा मेसेज केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षिका इतक्यावरच थांबली नाही..तिने विद्यार्थ्यासोबत असं काही बोलणं केलं, ज्यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे.

शिक्षिकेनं मर्यादा ओलांडली! विद्यार्थ्यानंही केलं असं काही.., WhatsApp चॅटचा स्क्रीनशॉट होतोय व्हायरल
Teacher WhatsApp Chat Viral
मुंबई:

Teacher-Student Chat Viral Screenshot :  काही कॉलेज किंवा शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं गुरु-शिष्याचं असतं. पण काही ठिकाणी शिक्षकी पेशेला काळिमा फासणाऱ्या घटनाही घडतात. आताच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक धक्कादायक गोष्टी वाऱ्यासारख्या व्हायरल होतात. अशाच प्रकारची एक घटना इंटरनेटवर समोर आली आहे. एका शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्यासाठी चक्क धमकीचा मेसेज केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना धमकीचे मेसेज पाठवले

खरंतर विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्यासाठी त्यांना प्रेरित करणं आवश्यक असतं. पण एका शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना धमकीचे मेसेज पाठवले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला असून पालकांमध्येही संताप पसरल्याचं म्हटलं जात आहे. विद्यार्थ्यासोबत चॅटिंग करता महिला शिक्षकाने म्हटलं की, "जास्त डोकं खराब आहे तुमचं.उद्या सगळ्यांनी यायचं. मला तुमची 100% अटेंडन्स पाहिजे. अटेंडन्सबद्दल बोलताना शिक्षिका धमकी देते की "ज्याने येऊन अटेंडन्स लावली नाही,त्यांना इंटरनलमध्ये मागेच ठेवल्याशिवाय राहणार नाही". 

नक्की वाचा >> Indigo नाही, जगातील 'या' फ्लाईट्स होतात सर्वात जास्त वेळा रद्द, तुमची फ्लाईट 'या' लिस्टमध्ये आहे का?

विद्यार्थ्यानं रेडिटवर स्क्रिनशॉट व्हायरल केले

Latest and Breaking News on NDTV

दरम्यान, विद्यार्थ्याने रेडिट पोस्टमध्ये लिहिलं आहे की, शिक्षिकेनं सर्व विद्यार्थ्यांना फी रिसीट शेअर करायला सांगितलं होतं.जेव्हा हे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरल केलं,तेव्हा त्यांनी सांगितलं की "सगळ्यांनी एक-एक करून ऑफिसमध्ये येऊन रिसीट दाखवा." विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की, "ही सामान्य गोष्ट नाहीय. महिला शिक्षकाने अशाप्रकारची धमकी देणे योग्य नाही". विद्यार्थ्याचे स्क्रीनशॉट पाहिल्यानंतर रेडिट यूजर्सने म्हटलंय की,  टीचर जणू उपकारच करत आहेत शिकवून..तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की,"या टीचरला ग्रुपमधून बाहेर काढा."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com