Lieutenant General Upendra Dwivedi: जगातील चौथ्या क्रमांकाच्या मोठ्या लष्कराला नवे प्रमुख मिळाले आहेत. आता लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi)हे नवे लष्करप्रमुख असणार आहेत. लेफ्टनंट जनरल द्विवेदी 30 जून रोजी दुपारी विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारतील. जनरल पांडे 31 मे रोजी निवृत्त होणार होते, पण सरकारने त्यांचा कार्यकाळ 30 जूनपर्यंत वाढवला.
मध्य प्रदेशातील रीवा येथील रहिवासी असलेले लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण केले. 1 जुलै 1964 रोजी जन्मलेले आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी, लेफ्टनंट जनरल द्विवेदी 1984मध्ये लष्कराच्या जम्मू व काश्मीर रायफल्सच्या 18व्या बटालियनमध्ये भरती झाले होते.
आपल्या 40 वर्षांच्या कारर्कीदीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. लष्कराचे सह-सेनाप्रमुख म्हणून नियुक्त होण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लष्कराच्या उत्तरी कमांडचेही प्रमुख पद भूषवले आहे. 2022-24 या काळादरम्यान त्यांनी पूर्व लडाखशी संदर्भात चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी जम्मू काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेतही सहभागी होते.
नक्की वाचा:
... म्हणून लोकसभा निवडणुकीत BJP ला फटका, RSS च्या मुखपत्रानं टोचले भाजपाचे कान
ओडिशाचे नवे मुख्यमंत्री ठरले, आदिवासी नेत्यावर भाजपानं दाखवला विश्वास
केंद्र सरकारमधील कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्रींमध्ये काय असतो फरक? वाचा संपूर्ण माहिती