भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वातील (BJP) एनडीएचं सरकार (NDA Government) तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शपथविधीनंतर 71 मंत्र्यांची खाती निश्चित केली आहे. मोदी सरकारमध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) आणि 36 राज्यमंत्री आहेत. सरकारमध्ये तीन पद्धतीनं मंत्र्यांची नियुक्ती केली जाते. या सर्वांची वेगवेगळी जबाबदारी आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात तीन प्रकारचे मंत्री असतात. कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister), राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार (Minister of State Independent Charge) आणि राज्यमंत्री (Minister of state). या तीन मंत्र्यांच्या पदांमध्ये काय अंतर आहे? प्रत्येक प्रकारातील मंत्र्यांची भूमिका काय असते? हा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांना सर्वाधिक अधिकार असतात. राज्यमंमत्री (स्वतंत्र प्रभार) हे दुसऱ्या श्रेणीत येतात. त्यांचे अधिकार कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा थोडे कमी असतात. त्यानंतर तिसऱ्या श्रेणीमध्ये राज्यमंत्र्यांचा समावेश होतो. त्यांचे अधिकार अन्य मंत्र्यांपेक्षा बरेच कमी असतात.
कॅबिनेट मंत्री
केंद्र सरकारमध्ये पंतप्रधानांच्या नंतर कॅबिनेट मंत्र्यांना अधिकार असतात. ते थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात. कॅबिनेट मंत्र्यांना एक पेक्षा जास्त मंत्रालय सोपवली जाऊ शकतात. त्या मंत्रालयाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असते. या मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहणं अनिवार्य असतं. याच बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. साधरणत: अनुभवी खासदारांना कॅबिनेटमंत्री केले जाते.
( नक्की वाचा : Modi 3.O : मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रिपद? एका क्लिकवर पाहा संपूर्ण खातेवाटप )
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
कॅबिनेट मंत्र्यांनतर राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचा नंबर येतो. या श्रेणीतील मंत्री देखील थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात. त्यांना सोपवण्यात आलेल्या विभागाचे ते स्वतंत्र प्रभारी असतात. त्या मंत्रालयाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असते. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी होत नाहीत. पण, आवश्यकता भासली तर ते या बैठकीत स्वत:चं मत मांडतात.
( नक्की वाचा : पुण्याच्या मुरलीधर मोहोळांकडं 2 महत्त्वाची खाती, वाचा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना काय मिळाली जबाबदारी? )
राज्यमंत्री
तिसऱ्या श्रेणीत राज्यमंत्र्यांचा समावेश होतो. राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांचे सहाय्यक असतात. ते पंतप्रधानांना नाही तर संबंधित कॅबिनेट मंत्र्यांना रिपोर्ट करतात. मंत्रालयाच्या आकारानुसार प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांना साहाय्यक म्हणून एक किंवा दोन राज्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते. गृह, अर्थ, आरोग्य, शिक्षण सारख्या मोठ्या मंत्रलायातील वेगवेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र राज्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world