Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु आहे. देशात 19 ए्प्रिलपासून सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून 4 जूनला निकाल जाहीर होतील. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? मोदींची हॅट्ट्रिक रोखण्यात विरोधक यशस्वी होणार का? या प्रश्नांची उत्तर 4 जून रोजी मिळणार आहेत. भारतीय मतदार कुणाला कौल देणार याची सर्व जगाला उत्सुकता असतानाच या निकालांवर प्रभाव टाकण्याचा चीन प्रयत्न करत आहे. 'मायक्रोसॉफ्ट' या बड्या टेक्नॉलजी कंपनीनं हा गंभीर इशारा दिलाय.
निवडणुकांच्या वर्षात China Virus
तैवानमधील अध्यक्षीय निवडणुकींच्या निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी चीननं एआयच्या मदतीनं प्रयत्न केला होता. मायक्रोसॉफ्टच्या थ्रेट इंटेलिजन्स टीम (threat intelligence team) नुसार चीनचा पाठिंबा असलेल्या सायबर ग्रुप उत्तर कोरियाच्या मदतीनं 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांना लक्ष्य करु शकते. मतदारांना प्रभावित करण्यासाठी चीन सोशल मीडियाच्या मार्फत एआय सामग्रीचा प्रयोग करु शकतो. आपल्या हिताच्या अनुकूल जनमत निर्माण करण्यासाठी चीन हा प्रयत्न करत आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
'यावर्षी जगभरातील प्रमुख देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. आमच्या अंदाजानुसार भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये स्वत:च्या हिताची जपणूक करण्यासाठी चीन एआयचा वापर करेल,' असं मायक्रोसॉफ्टनं म्हंटलंय.
AI चा निवडणुकांना धोका
मायक्रोसॉफ्टनं पुढं म्हंटलं आहे की, '
एआयचा वापर करुन खोटे साहित्य तयार केले जाऊ शकते. 'डीपफेक' तंत्रज्ञानाचा वापर काही सेलिब्रेटिंना बदनाम करण्यासाठी करण्यात आल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच उघड झाल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रभाव वाढलेल्या या जगाचा एआयच्या माध्यमातून गैरफायदा घेतला जाऊ शकतो, हे स्पष्ट झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टनं चीनबाबत दिलेला हा इशारा अधिक गंभीर आहे.