लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीए आणि विरोधी पक्षांमध्ये खेचाखेची पाहायला मिळत आहे. आज लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. 25 जून रोजी विरोधी पक्षांकडून के. सुरेश यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. एनडीएने पुन्हा एकदा ओम बिरला यांनाच लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
देशाच्या राजकारणात तिसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी विरोधी पक्षाकडून उपाध्यक्षपदाची मागणी केली जात होती. मात्र ती न मिळाल्याने विरोधी पक्षाने अध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर केला. दुसरीकडे राहुल गांधी विरोधी पक्ष नेतेपदी आहेत. ते निवडणुकीच्या मागणीवर कायम राहिले तर खासदारांमध्ये स्लिप किंवा चिठ्ठ्या वाटल्या जातील.
काय आहे लोकसभा खासदारांचा नंबरगेम?
लोकसभेतील आकड्यांबद्दल सांगायचं झालं तर एकूण खासदारांची संख्या 543 आहे. भाजपजवळ 240 खासदार आहेत. तर NDA कडे एकूण 293 खासदार आहेत. यामध्ये टीडीपीचे 16 आणि जेडीयूचे 12 खासदार आहेत. इंडिया आघाडीचे 235 खासदार आहेत. यात काँग्रेसचे 98 आणि अन्य 14 खासदार आहेत. तर एक जागा रिकामी आहे.
विशेष म्हणजे टीएमसी आणि YSRCP एनडीएला पाठिंबा देऊ शकते. लोकसभेत टीएमसीचे 29 खासदार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, काँग्रेसने त्यांच्याशी चर्चा न करताच उमेदवार निवडला. तर जगन मोहन रेड्डी यांच्या YSRCP चं म्हणणं आहे की, त्यांचे खासदार ओम बिरला यांना पाठिंबा देतील. तर तीन स्वतंत्र उमेदवार सुरेश यांच्या पक्षात असतील.
नक्की वाचा - लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी; केसी वेणुगोपाल यांची घोषणा
अन्य 17 खासदारांची काय आहे स्थिती?
अन्य 17 खासदारांबद्दल सांगायचं झालं तर YSRCP चे चार खासदार आणि तुरुंगातील बंद असलेले अमृतपाल सिंह आणि इंजिनियर राशिदने आतापर्यंत खासदारकीची शपथ घेतलेली नाही.
कागदाची स्लिप वाटून होऊ शकतं मतदान...
लोकसभा अध्यक्षपदाचं नाव आवाजी मतदानाने मंजूर केलं जाऊ शकतं. जर विरोधी पक्षाने मतांच्या विभाजनावर जोर दिला तर खासदारांना मतदानासाठी कायदाच्या स्लिप वाटल्या जातील. कारण नव्या खासदारांना जागा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले सिस्टीम वापरता येत नाही.
लोकसभेच्या 542 जागांमधील 293 जागा एनडीएजवळ आहे. 542 चे अर्धे केले तर 271 आकडा येते. यानुसार त्यांच्याजवळ लोकसभेत बहुमत आहे. अशात ओम बिरला यांना अध्यक्ष होण्यापासून काही अडचण होणार नाही, असं दिसतंय.