ओडिशाच्या पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरातील (Lord Jagannath Temple at Puri, Odisha) खजिना तब्बल 46 वर्षांना उघडण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारने 11 जणांच्या टीमची स्थापना केली होती. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार,ओडिसा उच्च न्यायालयाने श्री जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरविंद पाधी, अधीक्षक डीबी गडनायक आणि पुरीचे नामांकित राजा गजपती महाराज यांच्यासह 11 जणांचा समावेश या समितीत होता. मौल्यवान वस्तूची यादी तातडीने तयार केली जाणार नाही, असं या समितीने सांगितलं आहे.
भगवान जगन्नाथ मंदिरात रत्नांचे भांडार आहे. जगन्नाथ मंदिरातील जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तिन्ही देवतांचे दागिने या रत्नांच्या भांडारात ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. अनेक राजे आणि भक्तांनी परमेश्वराला दागिने अर्पण केले होते. रत्न भांडारातील दागिन्यांचे मूल्य अनमोल असल्याचे सांगितले जाते. आजपर्यंत त्याचे मूल्यमापन झालेले नाही. हे ऐतिहासिक भांडार जगन्नाथ मंदिराच्या जगमोहनच्या उत्तरेकडील तीरावर आहे.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार रत्न भांडारात तीन कक्ष आहेत. रत्न भांडार 14 जुलै 1985 मध्ये अखेरचं उघडण्यात आलं होतं. त्यानंतर हे भांडार कधीच उघडलं गेलं नव्हतं आणि त्याची चावी देखील गायब होती. यानंतर 1978 साली खजिन्याची यादी जाहीर करण्यात आली होती. 70 दिवस ही मोजणी सुरू होती. यामध्ये सोने, चांदी, रत्न आणि मौल्यवान दागिने मिळाले होते.
नक्की वाचा - नेपाळमध्ये पुन्हा 'ओली सरकार' चीनची चांदी की भारताचा फायदा?
1978 साली खजिन्यात काय-काय होतं?
त्यावेळी आतील खोलीत 367 सोन्याचे दागिने मिळाले होते. ज्यांचं वजन 4360 तोळे होतं. तर 231 चांदीचे दागिने ज्यांचा वजन 14,828 तोळे होतं. बाहेरील खोलीत 87 सोन्याचे दागिने मिळाले होते. ज्यांचं वजन 8470 तोळे होतं. तर चांदीचे 62 दागिने मिळाले होते. ज्यांचं वजन 7321 तोळे होते. अशाप्रकारे 1978 सालच्या मोजणीनुसार 12 हजार 831 तोळे सोने तर 22,153 तोळे चांदी येथे होती.
आता खजिन्यात काय मिळालं?
रत्न भांडारमध्ये बाहेरील खजिन्यात भगवान जगन्नाथाचा सोन्याचा मुकुट, प्रत्येकी 120 तोले वजनाचे तीन सोन्याचे हार आहेत. आतील खजिन्यात सुमारे 74 सोन्याचे दागिने आहेत, प्रत्येकाचे वजन 100 तोळ्यापेक्षा जास्त आहे, असे अहवालात म्हटलं आहे.