LPG Cylinder: घरगुती गॅसच्या डिलिव्हरीला का लागतोय उशीर? आता किती दिवसांत घरी पोहोचणार सिलिंडर? वाचा नियम

LPG Cylinder Delivery Rules: घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यास उशीर होणार असून OTP अनिवार्य करण्यात आला आहे. जाणून घ्या नवीन बुकिंग नियम आणि डिलिव्हरीला वेळ का लागतोय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"LPG Cylinder Update: घरगुती गॅस सिलिंडरची किती दिवसांत होणार डिलिव्हरी?"
PTI

LPG Cylinder: देशात एलपीजीबाबत गेल्या काही दिवसांत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे पुरवठा साखळीवर (Supply Chain) किंचित परिणाम झाल्याचं दिसतंय. दरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, देशात एलपीजी गॅसची कोणतीही टंचाई नाही. पण सिलिंडरच्या डिलिव्हरीला थोडा उशीर नक्कीच होत आहे.

आता किती दिवसांत मिळणार घरगुती सिलिंडर?

सुजाता शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "पूर्वीच्या तुलनेत सिलिंडरच्या डिलिव्हरीला थोडा उशीर होत आहे. पूर्वी सिलिंडर दोन ते तीन दिवसांत घरपोच मिळत असे, तेथे आता चार ते पाच दिवसांचा वेळ लागू शकतो. म्हणजेच तुमच्या घरी सिलिंडर पोहोचण्यासाठी साधारण दोन दिवस जास्त लागू शकतात." डिलिव्हरी प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी आता OTP (वन-टाइम पासवर्ड) प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी हा ओटीपी केवळ डिलिव्हरी बॉयलाच सांगावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement

(नक्की वाचा: April 1 Rules Change: तुमच्या एका चुकीमुळे लागू शकतो मोठा दंड; 1 एप्रिलपूर्वी जाणून घ्या 5 नवीन नियम)

सिलिंडरच्या डिलिव्हरीला उशीर का होत आहे?

सुजाता शर्मा यांच्या मते, याचे मुख्य कारण गॅसची कमतरता नसून ग्राहकांकडून केली जाणारी 'पॅनिक बुकिंग' (घाबरून केली जाणारी आगाऊ बुकिंग) हे आहे. अनेक लोक सिलिंडर संपण्यापूर्वीच बुकिंग करत आहेत, ज्यामुळे बुकिंगमध्ये सुमारे 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा पुरवठा यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला असून त्यामुळेच डिलिव्हरीला उशीर होत आहे. पण हा विलंब तात्पुरता असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल.

(नक्की वाचा: LPG vs PNG: पीएनजी की एलपीजी, घरगुती वापरासाठी कोणता गॅस सुरक्षित? LPG आणि PNGमध्ये काय आहे फरक? वाचा सविस्तर)

Advertisement

Photo Credit: NDTV Marathi

LPG सिलिंडर बुकिंग किती दिवसांनंतर करू शकता?

सिलिंडर बुकिंग नियमांनुसार, शहरी भागात एक सिलिंडर घेतल्यावर पुढील बुकिंग 25 दिवसांनंतरच करता येते. तर ग्रामीण भागात हा कालावधी 45 दिवस निश्चित करण्यात आला आहे. हे नियम सर्व ग्राहकांना समान रीतीने लागू आहेत. सरकारने जनतेला आवाहन केले आहे की, गरज नसताना गॅस बुकिंग करू नका. देशात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारच्या टंचाईची शक्यता नाही. संयम बाळगल्यास पुरवठा यंत्रणा सुरळीत राहील आणि सर्वांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत राहील.