जाहिरात

LPG vs PNG: पीएनजी की एलपीजी, घरगुती वापरासाठी कोणता गॅस सुरक्षित? LPG आणि PNGमध्ये काय आहे फरक? वाचा सविस्तर

LPG vs PNG: एलपीजी सिलिंडरमध्ये घरापर्यंत पोहोचवला जातो आणि वेळोवेळी याचे बुकिंग करावे लागते. तर पीएनजीचे थेट पाइपलाइनद्वारे घरापर्यंत कनेक्शन असते.

LPG vs PNG: पीएनजी की एलपीजी, घरगुती वापरासाठी कोणता गॅस सुरक्षित? LPG आणि PNGमध्ये काय आहे फरक? वाचा सविस्तर
LPG vs PNG: पीएनजी आणि एलपीजीमध्ये फरक काय?

LPG vs PNG: मध्य पूर्वेतील (Middle East) वाढत्या तणावामुळे भारतात गॅस टंचाईची समस्या निर्माण होत आहे. देशाच्या अनेक भागांतून एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या बातम्याही समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने गॅसशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. खरं तर स्वयंपाकाच्या गॅसचे महत्त्व लोकांना तेव्हाच समजते जेव्हा पुरवठा विस्कळीत होतो. पूर्वी एलपीजी गॅस सहज उपलब्ध असायचा, पण अमेरिका-इराण युद्धाच्या परिणामांमुळे भारताला आता टंचाईचा सामना करावा लागत आहे. या संघर्षामुळे 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) प्रभावित झाली आहे, जो गॅस आणि तेलाच्या पुरवठ्यासाठी जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. याच मार्गावरून भारत आणि जगातील अनेक देशांपर्यंत एलपीजी पोहोचतो. जेव्हा या मार्गावर अडथळे आले, तेव्हा पुरवठा कमी झाला. एलपीजी अतिशय आवश्यक गोष्ट आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करते. सकाळच्या चहापासून ते जेवणापर्यंत सर्व काही याच गॅसवर अवलंबून असते.

जेव्हा जगभरात इंधनाशी संबंधित तणाव वाढतो, तेव्हा स्वयंपाकासारखी रोजची कामंही असुरक्षित आणि अनिश्चित वाटू लागतात. यामुळेच आजच्या काळात एलपीजी आणि पीएनजीबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. भारतात घरगुती गॅससाठी प्रामुख्याने दोन पर्याय उपलब्ध आहेत: एलपीजी (Liquefied Petroleum Gas) आणि पीएनजी (Piped Natural Gas). या दोन्हीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, पण ते घरापर्यंत पोहोचण्याच्या पद्धती आणि त्याच्या गरजा वेगवेगळ्या आहेत.

एलपीजी आणि पीएनजीमध्ये काय फरक आहे? | LGP And PNG Difference

एलपीजी सिलिंडरमध्ये मिळतो. तो दाबाखाली भरून घरापर्यंत पोहोचवला जातो आणि वेळोवेळी त्याचे बुकिंग करावे लागते. याउलट पीएनजी थेट पाइपलाइनद्वारे घराघरांत पोहोचवला जातो. याचे कनेकशन जमिनीखालून थेट तुमच्या गॅस शेगडीपर्यंत केलेले असते, त्यामुळे वारंवार सिलिंडर बुक करण्याची आवश्यकता नाही. 

एलपीजी पुरवठा इतका विस्कळीत का होतो?

एलपीजी पुरवठा प्रभावित होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारताचे आयातीवर असलेली निर्भरता. भारतात काही प्रमाणात एलपीजीचे उत्पादन होते, पण घरगुती गरजेचा मोठा भाग आयात करावा लागतो. वर्ष 2024‑25 मध्ये भारताचा एलपीजी वापर सुमारे 3.13 कोटी टन होता, तर देशांतर्गत उत्पादन केवळ 1.28कोटी टनांच्या आसपास होते. याचा अर्थ असा की, उर्वरित गरज आखाती देशांतून आयात करून पूर्ण केली जाते आणि तिथल्या संघर्षामुळे पुरवठ्यावर परिणाम होतो.

(नक्की वाचा: LPG Crisis News: PNG गॅस संपेल का? पाइपलाइनद्वारे येणारा पीएनजी गॅस कुठून येतो? काय आहेत फायदे? वाचा सविस्तर)

पीएनजीवर कमी परिणाम का होतो?

पीएनजी हा देशाच्या 'सिटी गॅस नेटवर्क'चा भाग आहे. यामध्ये प्रामुख्याने मिथेन गॅस असतो, जो जमिनीखालून पाइपलाइनद्वारे घरांपर्यंत पोहोचवला जातो. घरांमध्ये मीटर बसवलेले असते आणि जेवढा गॅस वापरला जातो, तितकेच बिल येते. यात सिलिंडर बदलण्याची किंवा साठा करून ठेवण्याची गरज नसते.

(नक्की वाचा: Kerosene News: रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेल, LPGनंतर सामान्यांसाठी महत्त्वाची बातमी, 21 राज्यांसाठी अधिसूचना जारी)

एलपीजी की पीएनजी? सुरक्षेच्या दृष्टीने कोणता पर्याय योग्य? 

एलपीजी दाबाखाली सिलिंडरमध्ये भरलेला असतो. हा वायू हवेपेक्षा जड असतो, त्यामुळे गळती झाल्यास तो जमिनीलगत साचू शकतो. दुसरीकडे पीएनजी हवेपेक्षा हलका असतो. गळती झाल्यास तो वरच्या दिशेला पसरतो आणि हवेत मिसळतो. दोन्ही प्रकारच्या गॅसमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक असले, पण जोखमीचे स्वरूप वेगवेगळे असते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com