किचनचा खर्च होणार थेट अर्धा? LPG स्टोव्हच्या तुलनेत इथेनॉल स्टोव्हचा पर्याय कितपत चांगला, जाणून घ्या खर्च

LPG vs Ethanol: रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल आधारित स्टोव्ह तंत्रज्ञानाबाबत मोठी घोषणा केली आहे. एलपीजी सिलिंडरला पर्याय ठरू शकणारा हा इथेनॉल स्टोव्ह कसा काम करतो आणि यामुळे स्वयंपाकघराचा खर्च कसा अर्धा होणार, याबद्दल सविस्तर माहिती या लेखात वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
LPG VS Ethanol: गॅस सिलिंडरची कटकट संपणार?
Pexels

LPG vs Ethanol: देशात आता स्वयंपाकाची पद्धत बदलू शकते. कारण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल इंधनावर आधारित स्टोव्हबाबत जे मोठे विधान केले आहे, ते सामान्य माणसासाठी एखाद्या आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाहीय. हे तंत्रज्ञान केवळ स्वस्तच नाही, तर सुरक्षेच्या बाबतीतही चांगले मानले जात आहे.  

Photo Credit: pexels

इथेनॉल इंधनावर आधारित स्टोव्ह तंत्रज्ञानाबाबत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे की, येत्या काळात हे तंत्रज्ञान एलपीजी सिलिंडरची जागा घेऊ शकते आणि लोकांच्या स्वयंपाकघराचा खर्च खूप कमी होऊ शकतो.

Advertisement

इथेनॉल स्टोव्ह म्हणजे काय आणि ते कसं काम करते? (What is an Ethanol Stove and How it Works)

इथेनॉल स्टोव्ह... खरं तर, ही एक प्रगत (ॲडव्हान्स) कुकिंग सिस्टम आहे, जी ऊस आणि मका यासारख्या बायोमासपासून बनवलेल्या इंधनावर चालते. यामध्ये जेल किंवा लिक्विड (द्रवरूप) इथेनॉलचा वापर केला जातो, ज्याद्वारे धूर किंवा काजळीही येत नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे भांडीही काळे पडणार नाहीत आणि स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ राहील. हा स्टोव्ह जवळजवळ 700 ते 800 अंश सेल्सिअस तापमान निर्माण करतो, ज्यामुळे अन्न खूप जलदगतीने शिजते.

Photo Credit: pexels

(नक्की वाचा: LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)

LPG पेक्षा किती स्वस्त आणि सुरक्षित आहे? (Why Ethanol Stove is Cheaper and Safer than LPG)

एक लिटर इथेनॉलमध्ये सुमारे 15 तासांपर्यंत तीव्र आगीच्या ज्वाळा (आच) मिळू शकते, ज्यामुळे हे LPG सिलिंडरच्या तुलनेत खूपच परवडणारे ठरू शकते. यामध्ये गॅस गळतीचा (लीक होण्याचा) कोणताही धोका नसतो, ज्यामुळे अपघातांची शक्यता नगण्य असते. जर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आले, तर भारतीय कुटुंबांचे स्वयंपाकघराचे बजेट थेट अर्धे होऊ शकते. हे तंत्रज्ञान केवळ पैसेच वाचवणार नाही, तर पर्यावरणही प्रदूषणापासून मुक्त ठेवण्यास मदत करेल.