जाहिरात

Sonica Murlidharan: 'हे सर्व निराशाजनक...', सुब्रम्हण्यम यांच्या विधानावरुन वाद, अखेर L&T कडून स्पष्टीकरण

अनेक बड्या उद्योजकांनी यावर सोशल मीडियावरुन आपले मत व्यक्त करत नाराजी दर्शवली. सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्यानंतर आता एल अँड टीकडून या विधानावर महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

Sonica Murlidharan: 'हे सर्व निराशाजनक...', सुब्रम्हण्यम यांच्या विधानावरुन वाद, अखेर L&T कडून स्पष्टीकरण

लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. सोशल मीडियावर सुब्रम्हण्यम यांच्या या विधानावरुन जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. अनेक बड्या उद्योजकांनी यावर सोशल मीडियावरुन आपले मत व्यक्त करत नाराजी दर्शवली. सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्यानंतर आता एल अँड टीकडून या विधानावर महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी एल अँड टी (लार्सन अँड टुब्रो) चे अध्यक्ष एस.एन. सुब्रम्हण्यम  ९० तासांच्या कामकाजाच्या आठवड्यावरील सुब्रमण्यम यांच्या विधानावरून सुरू असलेल्या वादावर कंपनीच्या एचआर प्रमुख सोनिका मुरलीधरन यांनी त्यांचा बचाव केला आहे.  सुब्रम्हण्यम यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला होता, ज्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोनिका मुरलीधरन यांनी लिंक्डइनवर यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी अध्यक्षांचे विधान संदर्भाबाहेर घेतल्याने अनावश्यक वाद निर्माण झाला आहे.  हे विधान औपचारिक गप्पांदरम्यान करण्यात आले होते. यामध्ये कोणत्याही कठोर कार्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असं म्हटलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad : परळीत राडा! कराड समर्थक आक्रमक, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सोनिकाने सांगितले की, अध्यक्षांनी कधीही ९० तास काम करण्याचा आदेश दिला नाही किंवा सुचवले नाही. औपचारिक गप्पांदरम्यान अंतर्गत चर्चेदरम्यान केलेल्या या विधानाचा गैरअर्थ काढण्यात आला आणि त्यांचा हेतू काहीतरी वेगळा होता. आता हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे, परंतु एल अँड टीने हे स्पष्ट केले आहे की कंपनीची प्राथमिकता नेहमीच कर्मचाऱ्यांचे संतुलित जीवन राखणे आहे.

दरम्यान,  पुढे बोलताना सोनिका यांनी म्हटलं की, सुब्रमण्यम त्यांचे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखतात. ते त्यांच्या टीम सदस्यांना महत्त्व देतात. ते नवोपक्रम, कौशल्य विकास आणि वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन देतात. . चला त्यांना पाठिंबा देऊया, असं आवाहनही त्यांनी केलं 

ट्रेंडिंग बातमी- Walmik Karad: वाल्मिक कराड भोवती फास आवळला, बचावासाठी आई- पत्नी मैदानात, केली मोठी मागणी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: