जाहिरात

"डार्लिंग, तुझ्यासाठी पेपर लीक केलेत, कधी भेटतेयस?"; प्राध्यापकाची विद्यार्थिनीला थेट ऑफर! Audio Clip Viral

University Paper Leak Scandal 2026 : प्राणीशास्त्र विभागातील (Zoology) बी.एस्सी.च्या एका विद्यार्थिनीने हे ऑडिओ रेकॉर्डिंग विद्यापीठ प्रशासनाकडे सोपवले आहे.

"डार्लिंग, तुझ्यासाठी पेपर लीक केलेत, कधी भेटतेयस?"; प्राध्यापकाची विद्यार्थिनीला थेट ऑफर! Audio Clip Viral
University Paper Leak Scandal 2026 : एका विद्यार्थिनीकडे अवाजवी मागणी करणाऱ्या या प्राध्यापकाचा खरा चेहरा समोर आलाय.
मुंबई:

University Paper Leak Scandal 2026 : "डार्लिंग, तुझ्यासाठी दोन पेपर मिळवले आहेत. मला भेटायला कधी येतेयस?"

"सर, माझा अभ्यास झाला आहे आणि मी पूर्ण सिलॅबस वाचला आहे."

"म्हणजे तू मला एकदाही भेटायला येणार नाहीस का?"

"मला घरची कामं बघायची आहेत. मी येण्याचा प्रयत्न करेन."

"प्रयत्न नको, परीक्षेच्या आधी सात दिवसांच्या आत मला येऊन भेट."

लखनौ विद्यापीठातील एका सहाय्यक प्राध्यापकाचे हे धक्कादायक संभाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. पेपर लीक करून देण्याच्या बदल्यात एका विद्यार्थिनीकडे अवाजवी मागणी करणाऱ्या या प्राध्यापकाचा खरा चेहरा समोर आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

प्राणीशास्त्र विभागातील (Zoology) बी.एस्सी.च्या एका विद्यार्थिनीने हे ऑडिओ रेकॉर्डिंग विद्यापीठ प्रशासनाकडे सोपवले आहे. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक परमजीत सिंग हे संबंधित विद्यार्थिनीला परीक्षेपूर्वी भेटण्यासाठी दबाव टाकत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. विद्यार्थिनीने आपल्याला पेपरची गरज नसल्याचे सांगूनही प्राध्यापक तिला वारंवार बोलावून घेत होता. रेकॉर्डिंगच्या शेवटी त्या विद्यार्थिनीने असा दावा केला आहे की, तिला पुन्हा एकदा विनयभंग करण्याच्या उद्देशानेच सिंग यांनी बोलावले होते.

( नक्की वाचा : NEET Paper Leak: बापानं लाखो खर्चून पेपर चोरला, पण पोरगा अभ्यासात ढ! नीट परीक्षेतील सर्वात मोठी 'कॉमेडी' उघड )

दोन गंभीर गुन्ह्यांचा तपास

या प्रकरणात दोन मुख्य बाजू समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे एका महिला विद्यार्थिनीशी केलेले अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानजनक संभाषण, ज्याद्वारे चुकीच्या मागण्या केल्या जात होत्या. दुसरी बाजू म्हणजे कथित पेपर लीकचा प्रयत्न. देशभरात सध्या नीट 2026 पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआय करत असतानाच, लखनौ विद्यापीठात घडलेल्या या प्रकाराने परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विद्यापीठाची कारवाई आणि प्राध्यापकाचा बचाव

विद्यार्थिनीने पुराव्यासह तक्रार केल्यानंतर लखनौ विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी पोलिसांत धाव घेतली. विद्यापीठाने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून कुलगुरू जे.पी. सैनी यांनी अंतर्गत तक्रार निवारण समितीला 24 तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, परमजीत सिंग यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून विद्यापीठातील अंतर्गत राजकारणामुळे आपल्याला गोवले जात असल्याचा दावा केला आहे.

( नक्की वाचा : NEET Paper Leak : परीक्षेआधीच वाटला पेपर; लातूरचा प्राध्यापक PV कुलकर्णीने असा रचला होता पेपरफुटीचा प्लॅन )

विद्यार्थी संघटना आक्रमक

या घटनेचे पडसाद उमटताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने केली. आरोपी प्राध्यापकावर लैंगिक छळ आणि परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, संस्थेची प्रतिमा मलिन करणारा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com