जाहिरात

ChatGPT आणि Gemini च्या शर्यतीत 2 भारतीय तरुणांची मोठी झेप,3 वर्षांत कशी उभी केली 14,145 कोटींची कंपनी?

Made in India AI: एआय क्षेत्रातील एका भारतीय स्टार्टअप कंपनीने घेतलेली उत्तुंग झेप सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरली आहे. 

ChatGPT आणि Gemini च्या शर्यतीत 2 भारतीय तरुणांची मोठी झेप,3 वर्षांत कशी उभी केली 14,145 कोटींची कंपनी?
Made in India AI: वघ्या 3 वर्षांपूर्वी अत्यंत साधेपणाने सुरू झालेल्या या कंपनीने आता टेक जगताला थक्क केले आहे.
मुंबई:

Made in India AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या जगात सध्या अमेरिकेच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या जेमिनीचाच बोलबाला पाहायला मिळतो. पण आता या जागतिक शर्यतीत दोन भारतीय तरुणांनी इतिहास रचत थेट अमेरिकन दिग्गजांना आव्हान दिले आहे. एआय क्षेत्रातील एका भारतीय स्टार्टअप कंपनीने घेतलेली उत्तुंग झेप सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरली आहे. 

एका मोठ्या भारतीय आयटी कंपनीकडून मिळालेल्या तब्बल 1,427 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे या भारतीय कंपनीने थेट 1.5 बिलियन डॉलरच्या व्हॅल्यूएशनसह युनिकॉर्न क्लबमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. अवघ्या 3 वर्षांपूर्वी अत्यंत साधेपणाने सुरू झालेल्या या कंपनीने आता टेक जगताला थक्क केले आहे.

विदेशी दिग्गजांना आव्हान देणारी कंपनी 

गुगल जेमिनी आणि चॅटजीपीटी यांसारखे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्स इंग्रजी भाषेत चांगली कामगिरी करत असले, तरी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु किंवा बंगाली यांसारख्या भारतीय भाषांच्या बाबतीत त्यांचे रिझल्ट्स अनेकदा अपुरे पडतात. हीच अडचण ओळखून बेंगळुरू येथील विवेक राघवन आणि प्रत्युष कुमार या दोन इंजिनिअर्सनी आपली सुरक्षित नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सर्वम एआय या स्टार्टअपची पायाभरणी केली. 

सुरुवातीला जागतिक पातळीवरील महाकाय कंपन्यांसमोर हे दोन तरुण किती काळ टिकणार, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली होती. मात्र, सर्व आव्हानांवर मात करत त्यांनी 10 पेक्षा जास्त भारतीय भाषांवर आधारित, पूर्णपणे मेड इन इंडिया असलेला कस्टमाइज्ड एआय मॉडेल विकसित केला.

( नक्की वाचा : Elon Musk: बापरे! एलन मस्क यांच्याकडे इतका पैसा की भारताचा संपूर्ण गहू 35 वेळा खरेदी करू शकतात, वाचा आकडेवारी )

गुंतवणुकीचा आकडा आणि कंपनीचे नवे मूल्यांकन

विवेक आणि प्रत्युष यांच्या या विझनमधील ताकद ओळखून देशातील आघाडीची आयटी कंपनी एचसीएल टेकने सर्वम एआयमध्ये 1,427 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही भारतातील कोणत्याही एआई स्टार्टअपमधील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. या गुंतवणुकीच्या बदल्यात एचसीएल टेकला सर्वम एआयमध्ये 10.46% या प्रमाणात इक्विटी भागीदारी मिळाली आहे.

 सिरीज बी फंडिंग राउंड पूर्ण झाल्यानंतर सर्वम एआयचे एकूण मूल्यांकन आता 1.5 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 14,145 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सर्वम एआयने या सिरीज बी राउंडमधून आतापर्यंत एकूण 234 मिलियन डॉलरचा निधी उभारला आहे.

( नक्की वाचा : होर्मुझ बंद असतानाही अमेरिकेनं कसं काढलं 10 कोटी बॅरल तेल? NDTV ने शोधून काढले सॅटेलाइट पुरावे )
 

सर्वम AI चे वेगळेपण काय?

या भारतीय एआय मॉडेलची वैशिष्ट्ये केवळ भाषांपुरती मर्यादित नसून, त्यांनी विदेशी कंपन्यांच्या तुलनेत अत्यंत वाजवी दरात एआय सोल्यूशन्स उपलब्ध करून दिले आहेत. या मॉडेलमध्ये मशीनरी भाषेऐवी भारतीय भाषांमधील म्हणी आणि मानवी संवादाचा नैसर्गिक टच देण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे, सर्वम एआयचे टेक्स्ट-टू-स्पीच मॉडेल, सर्वम विजन आणि बुलबुल वी3 यांनी काही तांत्रिक चाचण्यांमध्ये गुगलच्या जेमिनी आणि ओपनएआयच्या चॅटजीपीटीलाही मागे टाकले आहे. हा मॉडेल 3 अब्ज पॅरामीटर्सवर आधारित असून, फोटो आणि हाताने लिहिलेले मजकूर अचूकपणे समजून घेण्यास सक्षम आहे.

बँकिंग क्षेत्रात वाढता दबदबा 

आज देशातील एसबीआय लाईफ, एलआयसी, आयडीएफसी फर्स्ट बँक, टाटा कॅपिटल आणि क्रेड यांसारख्या मोठ्या वित्तीय संस्था या भारतीय एआय मॉडेलचा वापर करत आहेत. एचसीएल टेकने केलेल्या या गुंतवणुकीमुळे सर्वम एआयला जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळणार आहे, तर दुसरीकडे एचसीएल टेकला देखील टीसीएस आणि इन्फोसिससारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा पुढे जाण्यास मदत होणार आहे. 

भविष्यात तब्बल 150 बिलियन डॉलरच्या भारतीय क्षेत्राला आपल्या कस्टमाइज्ड एआय सोल्यूशन्सने बदलण्याची तयारी या कंपनीने केली असून, दोन भारतीय इंजिनिअर्सची ही कामगिरी जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावणारी ठरली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com