महाकुंभ 2025 ला ऐतिहासिक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तुरुंगातील कैद्यांना यामध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 21 फेब्रुवारी रोजी राज्यातील 75 तुरुंगातील तब्बल 90 हजार कैद्यांना महाकुंभमधील पवित्र पाण्याने स्नान करता येणार आहे. यातून 90 हजारांहून अधिक कैदी महाकुंभशी अध्यात्मिकपणे जोडले जातील असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेश सरकारच्या या पुढाकारामुळे तुरुंगात सुधारणा आणि कैद्यांना धार्मिक मान्यतांशी जोडले जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जेल महानिर्देशक पीव्ही रामाशास्त्री यांनी सांगितलं की, तुरुंग मंत्र्यांच्या देखरेखीखाली व्यवस्था केली जात आहे.
नक्की वाचा - Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी कशामुळे झाली? चौकशी अहवालात कारण आलं समोर
काय आहे योगी सरकारचा प्लान?
महाकुंभच्या संगमावरील पाणी सर्व तुरुंगापर्यंत आणलं जाईल आणि नियमित पाणीमध्ये मिसळून तुरुंग परिसरातील एका छोट्या टँकमध्ये जमा केलं जाईल. सर्व कैदी प्रार्थना केल्यानंतर या पाण्याने स्नान करतील.
तुरुंगांमध्ये कधी होणार महाकुंभ स्नान?
21 फेब्रुवारी 2025
वेळ - सकाळी 9.30-10.00 वाजेपर्यंत
ठिकाण - उत्तर प्रदेशातील 75 तुरुंग
व्यवस्था कशी असेल?
तुरुंग प्रशासनाकडून प्रयागराजच्या संगम येथून गंगाजल आणलं जाईल आणि सर्व तुरुंगांमध्ये ते वाटण्यात येईल. हे पाणी तुरुंगाच्या आवारातील एका टाकीत साठवलं जाईल आणि नेहमीच्या पाण्यात मिसळले जाईल. प्रार्थनेनंतर कैदी या पवित्र पाण्याने स्नान करतील. या उपक्रमाचा उद्देश कैद्यांना महाकुंभाशी आध्यात्मिकरित्या जोडणे आहे, जेणेकरून त्यांना धार्मिक भावना अनुभवता येतील.