प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये (Mahakumbh 2025) आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी दर्शन घेतलं आहे. मकर संक्रातीला अमृत स्नानच्या दिवशी 3.5 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. आता 29 जानेवारीच्या मौनी अमावस्येच्या अमृत स्नानासाठी 10 कोटी श्रद्धाळू प्रयागराजला येतील असा अंदाज आहे. देशातील कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराज येथे दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे प्रयागराजला येणाऱ्या बस, ट्रेनमध्ये मोठी गर्दी आहे. विमानांच्या तिकीटांची मागणी कित्येक पटीने वाढल्यामुळे तिकीटदरही वाढला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मौनी अमावस्येसाठी विमानाच्या तिकीटदरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. चेन्नई ते प्रयागराजच्या राऊंड ट्रिपसाठी एक लाख ते सव्वा लाखांपर्यंत तिकीट पोहोचलं आहे. त्यातही कनेक्टिंग विमानाचं तिकीट सर्वात जास्त आहे. 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला चेन्नईहून पहिली कनेक्टिंग फ्लाइट मुंबईच्या मार्गाने दुपारी 1.14 वाजता प्रयागराजला पोहोचेल. ही फ्लाइट 30 जानेवारी रोजी दुपारी २ वाजता चेन्नईसाठी निघेल. यासाठी प्रवाशाला 1.13 लाखांपर्यंत मोजावे लागतील.
नक्की वाचा - वर्धा पोलिसांमुळे 15 वर्षांनंतर तुटलेलं नातं पुन्हा जुळलं; अनाथ इशाला सापडलं तिचं कुटुंब!
दिल्लीहून प्रयागराजसाठी एअर इंडिया, अकासा एअर, इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या विमानसेवेचं तिकीट 50 हजारांपासून 70 हजारांदरम्यान आहे. फ्लेक्सी फेअरमुळे याचं तिकीट एक लाखांपर्यंत जाऊ शकतं. यानुसार मुंबई-प्रयागराजचं तिकीट 60 हजार रुपये, हैद्राबाद-प्रयागराजचं तिकीट 54 हजार, बंगळुरू-प्रयागराजचं तिकीट 70 हजार, कोलकाता-प्रयागराज ७० हजार, अहमदाबाद-प्रयागराज 54 हजार, भुवनेश्वर-प्रयागराज 49 हजार, रायपूर-प्रयागराज 48 हजार, लखनऊ-प्रयागराज 49 हजार, गुवाहाटी-प्रयागराजचं तिकीट 50 हजार, जयपूर-प्रयागराजचं तिकीट 54 हजार आणि मुंबई-प्रयागराजसाठी 55 हजारापर्यंत तिकीट पोहोचलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world