आजपासून जगातील सर्वात मोठं धार्मिक आयोजनांपैकी एक महाकुंभ 2025 चा शुभारंभ होत आहे. पुढील 45 दिवस सुरू असणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यात 30 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रयागराजमध्ये आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ होणार असून पहिलं शाही स्नान आज पार पडणार आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर 50 लाख भाविक गंगेत स्नान करणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान एकूण सहा शाही स्नान होतील. कुंभमेळाव्याचा पहिला शाही स्नान 13 जानेवारी म्हणजे आज पार पडेल. दुसरं शाही स्नान 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रातीवर असेल. तर तिसरं स्नान 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्येवर होईल, चौथं स्नान 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमीवर होईल. पाचवं शाही स्नान 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमावर होईल आणि शेवटचं शाही स्नान 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री असेल.
नक्की वाचा - Gautam Adani : "कधी कधी वाटतं दैवी शक्तीमुळेच इथपर्यंत पोहोचलो" : गौतम अदाणी
45 हजार पोलीस कर्मचारी तैनात..
सुरक्षेचा विचार करता यंदा सुरक्षेत 55 हून अधिक फोर्स सामील झाले आहेत. या आयोजनादरम्यान तब्बल 45,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Mahakumbh 2025 : स्टीव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेलना शिवलिंगाला स्पर्श का करू दिला नाही?
हरवलेल्या आणि सापडलेल्या व्यक्तींची माहिती संगणकात नोंदवली जाईल आणि माहिती देणाऱ्याला संगणकीकृत पावती दिली जाईल. बेपत्ता व्यक्तींचे फोटो आणि तपशील एका मोठ्या 55 इंचाच्या एलईडी स्क्रीनवर प्रसारित केले जातील. सर्व केंद्रे आधुनिक संपर्क प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडलेली आहेत. फेसबुक, एक्स, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे देखील माहिती प्रसारित केली जाईल.