महाकुंभातील 'ती' Viral Girl करणार मुस्लीम मुलाशी लग्न, घरं आणि कुटुंबही सोडलं! प्रकरण काय?

Mahakumbh Viral Girl : मोनालिसाने तिच्या मुस्लिम प्रियकरासोबत घर सोडून केरळ गाठले असून तिथे तिने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mahakumbh Viral Girl : मोनालिसा करणार मुस्लीम बॉयफ्रेंडसोबत लग्न
मुंबई:

Mahakumbh Viral Girl : प्रयागराजमध्ये मागच्या वर्षी झालेल्या महाकुंभमध्ये  निळ्या डोळ्यांनी लाखो लोकांना भुरळ घालणारी आणि रातोंरात सोशल मीडिया सेन्सेशन ठरलेली व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडली आहे. यावेळी चर्चेचे कारण तिचे कोणतेही फोटोशूट नसून तिचे वैयक्तिक आयुष्य आणि लग्नाचा निर्णय आहे. मोनालिसाने तिच्या मुस्लिम प्रियकरासोबत घर सोडून केरळ गाठले असून तिथे तिने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या नावाची चर्चा सुरू झाली असून या प्रकरणाला आता कौटुंबिक आणि धार्मिक वळण मिळाले आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसा भोसले आपल्या प्रियकरासोबत केरळमधील तिरुवनंतपुरम येथील तम्पानूर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. तिने पोलिसांना सांगितले की, तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मोनालिसाचा प्रियकर फरमान हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून या दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. गेल्या 1.5 वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र, दोघांचे धर्म वेगळे असल्याने या नात्याला घरातून तीव्र विरोध होत होता.

( नक्की वाचा : Doctor Suicide: मैत्री, प्रेम आणि नंतर छळ...फौझीलनं स्तुतीला टोकाचं पाऊल उचलण्यास कसं भाग पाडलं? मोठा खुलासा )
 

मोनालिसाने पोलिसांकडे तक्रार केली आहे की, तिचे वडील जय सिंह भोसले आणि इतर कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात आहेत. कुटुंबाकडून तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता आणि तिला घरी परतण्यासाठी धमकावले जात होते. याच कारणामुळे तिने आपले घर सोडले आणि सुरक्षिततेसाठी थेट केरळ गाठले. 

Advertisement

आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तिने पोलिसांकडे सुरक्षेची विनंती केली. या प्रकरणानंतर पोलिसांनी मोनालिसाच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता ती कायद्याने बालिग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी काय केलं?

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच मोनालिसाच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले होते. मात्र, मोनालिसाने आपल्या निर्णयावर ठाम राहत कुटुंबासोबत जाण्यास नकार दिला. कायद्यानुसार ती सज्ञान असल्याने तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे स्पष्ट करत पोलिसांनी तिला तिच्या इच्छेनुसार जाण्याची परवानगी दिली आहे. सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मोनालिसाचा हा धाडसी निर्णय सध्या अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Doctor Suicide :''तू फ्रिजमध्ये सापडशील"; MDS च्या विद्यार्थिनीच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख, प्रकरण काय? )

मोनालिसा भोसले ही 2025 मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ दरम्यान पहिल्यांदा समोर आली होती. रुद्राक्ष आणि माळा विकतानाचे तिचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. तिच्या सौंदर्यामुळे तिला 'द डायरी ऑफ मणिपुर' या चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली होती. प्रसिद्धी मिळाल्यानंतर ती अनेक वादांमध्येही अडकली होती, पण आता तिने थेट आंतरधर्मीय विवाह करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा ती केंद्रस्थानी आली आहे.
 

Topics mentioned in this article