आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपले अॅडमिट कार्ड जवळ असल्याची खात्री करा असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलं आहे.
Amravati News: अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित
अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित...
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली होती तक्रार...
महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका...
पाटील विरुद्ध जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सादर केला होता शासनाकडे अहवाल..
आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कामकाज, गौण खनिजाच्या कामात अनियमितता केल्याची पाटील यांच्याविरुद्ध होती तक्रार...
राहुल पाटील यांची विभागीय चौकशीही होणार...
Beed News: स्वतःचा जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना कॉप्यांचा पुरवठा; बीडमधील प्रकार
बीडमध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शिक्षण विभागाकडून कॉपी रोखण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली. मात्र या सर्व नियमांना हरताळ फासळत बीडमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आली आहे.
आज बारावीचा पहिला पेपर होता. आणि याच पेपर साठी बीड शहरातील बलभीम महाविद्यालयासह इतर परीक्षा केंद्रा बाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता अनेकांनी कॉप्या पुरवण्याच्या उद्योग केला आहे.
Ambad Crime: महाकाळा गावात 9 लाखाचा गांजा जप्त,गोंदी पोलिसांची कारवाई
अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महाकाळा गावात जिलानी यांच्या वाड्यात अवैधरित्या गांजा विक्री केल्या जात असल्याची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी छापा टाकून 29 किलो 650 ग्राम विक्रीसाठी आणलेला 9 लाखाचा गांजा जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी जिलाणी शेख, मुजम्मिल शेख, मुस्तकिम शेख व.नुसरतजहा अफसर शेख यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Mumbai Crime: उच्चभ्रू सोसायटीमध्ये दुहेरी आत्महत्या; वसईत खळबळ
वसईतील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दुहेरी आत्महत्या.
कर्जबाजारीपणाला कंटाळून भाऊ आणि बहिणीची आत्महत्या.
लहान भाऊ हनुमंता श्रीधर प्रसाद (40) आणि बहीण यमुना श्रीधर प्रसाद (45) वर्षे यांनी विषारी औषध प्राषण करुन केली आत्महत्या:
वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटीमधील मंगल वंदन सोसायटी मधील घटना
आचोळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Latur News: पाण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्याचे शोले स्टाईल आंदोलन
लातूर शहरालगत असलेल्या महाराणा प्रताप नगर येथील जलजीवन मिशन अंतर्गत घरणी धरणापासून येणाऱ्या पाईपलाईनच्या कामाचे तोंडी आदेश उठवून, कामास तातडीने सुरुवात करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष जाधव यांनी करीमनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल आहे.मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात कामास सुरुवात होत नाही तोपर्यंत जलकुंभावरून खाली उतरणार नसल्याची भूमिका जाधव यांनी घेतली होती.
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे- अमित शाह यांची भेट होण्याची शक्यता
एकनाथ शिंदे अमित शह यांची आज भेट घेणार - सूत्र
आज दिल्लीत पुरस्कार सोहळा पार पडल्या नंतर भेट घेण्याची शक्यता
काही दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा
तसेच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत अद्याप निर्णय नाही
या बाबत या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार
Latur News: सोयाबीन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा पिकअप पलटी; 7 जण जखमी
हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने लातूरच्या बाजारात सोयाबीन घेऊन येणाऱ्या पिकअप पलटी होऊन सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.औसा तालुक्यातील बुधोडा येथील ब्रिजवर सोयाबीन घेऊन लातूरला येणारा पिकअपचा एक्सेल रॉड तुटल्याने झाला पलटी झाला आहे त्यातील 7 जण जखमी झाले आहेत.
Live Updates: किल्ले रायगडावर संभाजी भिडे गुरूजी यांच्या गडकोट मोहिमेची सांगता
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्या धारातिर्थ यात्रेची आज किल्ले रायगडावर सांगता झाली यावेळी गुरूजी यांनी लाखो धारकरी यात्रे करुंना संबोधित केलं.यावेळी त्यांनी गोहत्या प्रकरण असेल . देशातील मद्यपान च्या आहारी गेलेली तरुणाई असेल यावर भाष्य करत हा देश या मार्गाने अधोगतीला जात असल्याचं म्हटल.आपला देश एकत्र चाललं पाहिजे.आणि हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी संविधान चे पालन करणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी म्हटल. येणाऱ्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची पदयात्रा हा प्रत्येक गावातून निघणार असल्याचं सुध्दा त्यांनीं यावेळी म्हटल.
Chhattisgarh News: नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन दोन जवान जखमी
छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जंगलात पेरून ठेवलेल्या आयईडी स्फोटकांचा स्फोट होऊनचा सीआरपीएफ बटालियन क्रमांक 231 च्या दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे
Hingoli News: हिंगोलीतील शेतकरी अर्ध नग्न अवस्थेत मुंबईच्या दिशेने रवाना
हिंगोलीसह राज्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी उद्या मुंबई येथे मंत्रालयावर अर्ध नग्न मोर्चा निघणार आहे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, सरसकट पिकविमा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा यासारख्या अनेक मागण्या घेत हिंगोलीतील शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, दरम्यान सरकारन निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नसल्याचा आरोप करत हे शेतकरी मुंबईकडे रवाना झाले आहेत...
Nashik News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याची वार्षिक जिल्हानियोजन समितीची बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याची वार्षिक जिल्हानियोजन समितीची बैठक पार पडणार आहे
पहिली अहिल्यानगर जिल्ह्याची वार्षिक जिल्हानियोजन समितीची बैठक पार पडणार आहे या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,अहिल्यानगर चे जिल्हाधिकारी आणि आमदार उपस्थित आहेत
अहिल्यानगर जिल्ह्याची बैठक संपल्यावर नाशिक जिल्ह्याची वार्षिक जिल्हानियोजन समितीची बैठक पडेल
नाशिक जिल्ह्याच्या या बैठकीला मंत्री नरहरी झिरवळ,आमदार नितीन पवार,मंत्री माणिकराव कोकाटेमंत्री दादा भुसे हे मंत्री उपस्थित राहणार आहेत
Mumbai News: पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांची मंत्रीमंडळ बैठकीत नाराजी
पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्री यांची मंत्रीमंडळ बैठकीत नाराजी
प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्यासोबत पालक सचिवांची नेमणुक करण्यात आली आहे
मात्र ११ पालकसचिव अद्याप ही आपापल्या जिल्ह्यात गेले नसल्याने मुख्यमंत्री यांची नाराजी
मंत्रीमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री झाले संतप्त
तात्काळ सर्व पालक सचिवांनी त्या जिल्हात जाऊन बैठका घेण्याचे मुख्यमंत्री यांचे आदेश
Miraj Crime: परीक्षेच्या एक दिवस आधी टोकाचे पाऊल; बारातीमधील विद्यार्थ्याची आत्महत्या
राज्यात आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार होता.मिरजेत परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रथमेश बिराजदार परीक्षा कशा सोडवायच्या याचे लेक्चर ऐकून घरी आला होता.रात्री घरी आल्यानंतर आपल्या खोलीत जाऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
परीक्षेच्या तणावामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.घटनेची नोंद मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.
Pune News: इंदापुरातील शरद कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
पुण्याच्या इंदापूर मध्ये 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान शरद कृषी महोत्सव पार पडत असून याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.या शरद कृषी महोत्सवाला खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील यांसह आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नियोजन बैठकीत बाचाबाची
- शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
- 14 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाशिकला आभार दौरा
- दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीत बाचाबाची
- आमंदार सुहास कांदे यांनी पदाधिकाऱ्यांना धरले धारेवर
- शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्याच्या दिल्या सूचना
- शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी गटतट असले तरी पक्षासाठी सर्वांनी एकत्र यावे लागते असे बोलत अंतर्गत गटबाजी केली अधोरेखित...
Amravati Crime: नगरसेविकेच्या घरी चोरी, आरोपी अटकेत
अमरावतीत माजी नगरसेविका लविना हर्षे यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आंतरराजीय घरफोडीच्या टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सतनामसिंग बावरी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 14.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तर चोरीत सहभागी असलेले त्याचे अन्य दोन साथीदार हे पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ही कारवाई केली.
Beed Crime: परळीजवळील शिरसाळा येथे दोन गट आपापसात भिडले
बीडच्या परळी जवळील शिरसाळा येथे दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये एक बुलेट गाडी पेटविण्यात आलीय. या प्रकरणात परस्परविरोधी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परळी तालुक्यातील शिरसाळा येथे आठवडी बाजारात दोन गटात तुफान हाणामारी झाली.
या घटनेतील एका गटाने बुलेट पेटवली, विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपचे चालक सैफ सलीम कुरेशी यांना पोहनेर येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे.. अशी धमकी दिली.. या नंतर वाद घातल्यानंतर दोन गट आपापसात भिडले..
Live Update : वादग्रस्त वक्तव्याचा फटका, रणवीर अलाहाबादियाच्या घरी पोहोचले पोलीस
वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियाच्या घरी पोहोचले पोलीस
Live Update : मुंबईतील जोगेश्वरी भागात आग, अग्निशमक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईतील जोगेश्वरी भागात मोठी आग, अग्निशमक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
Live Update : महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदत वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदत वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महालक्ष्मी सरस फेस्टिव्हलमधून Live
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महालक्ष्मी सरस फेस्टिव्हलमधून Live
Live Update : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे परळीहून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना
महादेव मुंडे यांच्या पत्नी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेण्यासाठी परळीहून रवाना झाल्यात. या प्रकरणातील आरोपी अटक केले जावे अन्यथा याचा तपास एसआयटी किंवा सीआयडी कडे देवून न्याय द्यावा अशी मागणी मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.
Live Update : ग्रामीण भागातील प्रसिद्ध लेखक रावसाहेब रंगराव बोराडे यांचं निधन
मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार विशेषतः ग्रामीण लेखक म्हणून ओळख असणारे रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
Live Update : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिकe
याप्रकरणातील सर्व आरोपी जामीनावर असताना केवळ मीच अद्याप जेल मध्ये का? वाझेचा याचिकेतून सवाल.
Live Update : पुण्यात GBS मुळे आणखी एक मृत्यू, बळींची संख्या 7 वर
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ३७ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या १९२ वर पोहोचली आहे.
Live Update : एका बांग्लादेशी इसमाकडे सापडले दोन देशांचे पासपोर्ट
- बांग्लादेशी नागरिकांच्या पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
- एका बांग्लादेशी इसमाकडे सापडले दोन देशांचे पासपोर्ट
- सुमन गाजी याने दोन्ही देशांच्या काही एजंटांना हाताशी धरून पासपोर्ट बनवल्याचा संशय
- बारा वर्षांपूर्वीच आला होता सुमन गाजी भारतामध्ये
- गेल्या आठवड्यात आठ बांग्लादेशी नागरिकांना नाशिक पोलिसांनी केली होती अटक
- मालेगावसोबत नाशिकचे बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणाने पोलिसांसमोर मोठे आव्हान
Live Update : पेडगाव ग्रामपंचायतीत शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतने लहान मुलाच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव केला आहे. या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही ठरावाच स्वागत केल असून आता गावात ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. गावात कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्स विक्री केले जात नाही. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. तसेच इतर गावांनी देखील असा निर्णय घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
Live Update : सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख देणार आज बारावीची परीक्षा
आज पासून राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी गेल्याम दोन महिन्यापासून लढा देत असलेली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही देखील आजपासून सुरू होणाऱ्या बारावीची परीक्षा घेणार आहे.