जाहिरात
32 minutes ago

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपले अॅडमिट कार्ड जवळ असल्याची खात्री करा असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलं आहे. 
 

Miraj Crime: परीक्षेच्या एक दिवस आधी टोकाचे पाऊल; बारातीमधील विद्यार्थ्याची आत्महत्या

राज्यात आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार होता.मिरजेत परीक्षेच्या  आदल्या दिवशी प्रथमेश बिराजदार परीक्षा कशा सोडवायच्या याचे लेक्चर ऐकून घरी आला होता.रात्री घरी आल्यानंतर आपल्या खोलीत जाऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

परीक्षेच्या तणावामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.घटनेची नोंद मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.

Pune News: इंदापुरातील शरद कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

पुण्याच्या इंदापूर मध्ये 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान शरद कृषी महोत्सव पार पडत असून याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.या शरद कृषी महोत्सवाला खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील यांसह आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नियोजन बैठकीत बाचाबाची

- शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर 

- 14 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाशिकला आभार दौरा 

- दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीत बाचाबाची

- आमंदार सुहास कांदे यांनी पदाधिकाऱ्यांना धरले धारेवर

- शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्याच्या दिल्या सूचना

- शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी गटतट असले तरी पक्षासाठी सर्वांनी एकत्र यावे लागते असे बोलत अंतर्गत गटबाजी केली अधोरेखित...

Amravati Crime: नगरसेविकेच्या घरी चोरी, आरोपी अटकेत

अमरावतीत माजी नगरसेविका लविना हर्षे यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आंतरराजीय घरफोडीच्या टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सतनामसिंग बावरी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 14.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तर चोरीत सहभागी असलेले त्याचे अन्य दोन साथीदार हे पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ही कारवाई केली.

Beed Crime: परळीजवळील शिरसाळा येथे दोन गट आपापसात भिडले

बीडच्या परळी जवळील शिरसाळा येथे दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये एक बुलेट गाडी पेटविण्यात आलीय. या प्रकरणात परस्परविरोधी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  परळी तालुक्यातील शिरसाळा येथे आठवडी बाजारात दोन गटात तुफान हाणामारी झाली. 

या घटनेतील एका गटाने बुलेट पेटवली, विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपचे चालक सैफ सलीम कुरेशी यांना पोहनेर येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे.. अशी धमकी दिली.. या नंतर वाद घातल्यानंतर दोन गट आपापसात भिडले..

Live Update : वादग्रस्त वक्तव्याचा फटका, रणवीर अलाहाबादियाच्या घरी पोहोचले पोलीस

वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियाच्या घरी पोहोचले पोलीस

Live Update : मुंबईतील जोगेश्वरी भागात आग, अग्निशमक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील जोगेश्वरी भागात मोठी आग, अग्निशमक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Live Update : महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदत वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदत वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महालक्ष्मी सरस फेस्टिव्हलमधून Live

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महालक्ष्मी सरस फेस्टिव्हलमधून Live

Live Update : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे परळीहून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना

महादेव मुंडे यांच्या पत्नी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेण्यासाठी परळीहून रवाना झाल्यात. या प्रकरणातील आरोपी अटक केले जावे अन्यथा याचा तपास एसआयटी किंवा सीआयडी कडे देवून न्याय द्यावा अशी मागणी मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.

Live Update : ग्रामीण भागातील प्रसिद्ध लेखक रावसाहेब रंगराव बोराडे यांचं निधन

मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार विशेषतः ग्रामीण लेखक म्हणून ओळख असणारे रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.

Live Update : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी 

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिकe 

याप्रकरणातील सर्व आरोपी जामीनावर असताना केवळ मीच अद्याप जेल मध्ये का? वाझेचा याचिकेतून सवाल.

Live Update : पुण्यात GBS मुळे आणखी एक मृत्यू, बळींची संख्या 7 वर

राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ३७ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या १९२ वर पोहोचली आहे.

Live Update : एका बांग्लादेशी इसमाकडे सापडले दोन देशांचे पासपोर्ट

- बांग्लादेशी नागरिकांच्या पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

- एका बांग्लादेशी इसमाकडे सापडले दोन देशांचे पासपोर्ट

- सुमन गाजी याने दोन्ही देशांच्या काही एजंटांना हाताशी धरून पासपोर्ट बनवल्याचा संशय

- बारा वर्षांपूर्वीच आला होता सुमन गाजी भारतामध्ये

- गेल्या आठवड्यात आठ बांग्लादेशी नागरिकांना नाशिक पोलिसांनी केली होती अटक

- मालेगावसोबत नाशिकचे बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणाने  पोलिसांसमोर मोठे आव्हान

Live Update : पेडगाव ग्रामपंचायतीत शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव

अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतने लहान मुलाच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव केला आहे. या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही ठरावाच स्वागत केल असून आता गावात ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. गावात कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्स विक्री केले जात नाही. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. तसेच इतर गावांनी देखील असा निर्णय घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Live Update : सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख देणार आज बारावीची परीक्षा

आज पासून राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी गेल्याम दोन महिन्यापासून लढा देत असलेली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही देखील आजपासून सुरू होणाऱ्या बारावीची परीक्षा घेणार आहे.