48 minutes ago

जूनचा अर्धा महिना उलटला असून अजूनही मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात अपेक्षित पाणीसाठा पाहायला मिळत नाही. आज रोजी या धरणात केवळ 29 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्यास तेथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात. त्यानंतरच वरील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. मात्र अजून पाण्याची मोठी आवक जायकवाडी धरणात झाली नसल्याचे चित्र आहे. 

Jun 19, 2025 19:09 (IST)

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रा पाण्याचा विसर्ग वाढवला

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1920 क्युसेक्स विसर्ग वाढवून संध्याकाळी 07:00 वा. 8734 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.  असं आवाहन  उपविभागीयअभियंता मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग यांनी केलं आहे. 

Jun 19, 2025 18:31 (IST)

जूने नाशिक परिसरात एका वाड्याचा काही भाग कोसळला

- जूने नाशिक परिसरात एका वाड्याचा काही भाग कोसळला

- कुठलीही जीवित हानी नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर  

- पावसाची संततधार सुरू असल्याने घडली घटना 

- मलबा हटवण्याचे काम स्थानिक नागरिक आणि अग्निशमन विभागाकडून सुरू

Jun 19, 2025 18:01 (IST)

Live Update : काळू नदीच्या पुरामुळे दहा गावांचा कल्याण शहराशी संपर्क तुटला

सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पावसाचे पाणी घरात आणि शेतांमध्ये शिरल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे हाल सुरू आहेत.रूंदे गावाजवळील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने फळेगाव, रूंदे, उशिद, हाल, मढ, पळसोली, काकडपाडा, दानबाव, आंबिवली, आराळे आणि भोंगळपाडा या १० ते १२ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. आज सकाळपासूनच दोन्ही बाजूंनी नागरिक अडकून पडले असून चाकरमानी, व्यापारी, रिक्षाचालक, दूध व भाजीपाला विक्रेत्यांचे हाल होत आहेत.

Jun 19, 2025 17:16 (IST)

Live Update : जव्हार मोखाडा परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. जव्हार मोखाडा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली. गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. खोडाळा  - कसारा दरम्यान गारगाई नदीवरील पुलावर पाणी साचल्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर, दुसरीकडे जोरदार पावसामुळे मोखाडा तालुक्याकतील शिरसगाव-देवबांध रस्ता  पाण्याखाली आल्याकने या मार्गकवरील वाहतूक बंद झाली आहेत. तर, धामणशेत फाटा येथील मोरी लगतचा भराव पावसामुळे खचल्यामुळे यामध्ये डंपर अडकला आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक देखील बंद झाली आहे.

Advertisement
Jun 19, 2025 16:30 (IST)

उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ, नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा

कल्याण- गेल्या २४ तासापासून कल्याण डोबिवलीच्या आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु आहे. अधून मधून जोरदार पाऊस कोसळत असल्याने काही सखल भागात पाणी साचले आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदी किनारी राहणाऱ््या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती कल्याण तहसीलदार कार्यालाकडून देण्यात आली आहे.

Jun 19, 2025 16:29 (IST)

Rain News: खेड बाजारपेठमध्ये जगबुडी नदीचे पाणी भरण्यास सुरुवात

खेड बाजारपेठमध्ये जगबुडी नदीचे पाणी भरण्यास सुरुवात 

 गांधी चौकपर्यत आले पाणी 

जगबुडी नदीची पाण्याची पातळी ९.४० मीटरवर 

नगर परिषद  प्रशासन अलर्ट मोडवर 

वडगाव, शिरगाव, तुळशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.

 त्यामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

खेड मध्ये एन. डी.आर.एफ. टीम  दाखल होणार,  तहसीलदार सोनावणे यांची माहिती

Advertisement
Jun 19, 2025 16:20 (IST)

मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील बोरघर येथे महामार्गावर पाणीच पाणी

मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील बोरघर येथे महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे वाहतुक खोळंबली आहे.  मुंबईकडे जाणारी वाहतुक दुसर्‍या मार्गिकेवरून सुरू करण्यात आली आहे.  महामार्गाच्या ढिसाळ कामाचा  फटका सध्या बसत आहे. 

Jun 19, 2025 16:19 (IST)

पुण्याच्या हिंजवडी माण परिसरातील रस्ते जलमय

पुण्याच्या हिंजवडी माण लगतच्या मेगापोलिस फेज 3, गेरा आधारा च्या परिसरातील रस्ते जलमय झालेत. अतिवृष्टीमुळं रस्त्यांना नदीचं रुप आलंय. पहाटे पासून अधूनमधून पाऊस तुफान हजेरी लावतोय, परिणामी सकल भागात पाणी साचले आहे.किमान गुडघाभर पाणी रस्त्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय...

Advertisement
Jun 19, 2025 16:18 (IST)

मलकापूर परिसरात मुसळधार पाऊस

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर परिसरात आज दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजल्याचा प्रकार घडला ..त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे .. परिणामी पावसाने भिजलेल्या शेतमाल आता अडत व्यापारी घ्यायला तयार नाहीत .. तर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी शेतकऱ्यांचा शेतमाल आणला तर त्यांना तो माल ठेवण्यासाठी टिन शेड बनविले असताना ही त्याठिकाणी व्यापाऱ्यांचा माल ठेवलेला असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल हा उघड्यावरच ठेवावा लागतो .. शेतकऱ्यांसाठी बनविलेले टिन शेड रिकामे करून द्यावे, अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केलीय.

Jun 19, 2025 16:17 (IST)

Rain News: पावसामुळे हिंजवडीकडे जाणाऱ्या नागरिकांचे हाल

पावसाच्या संततधारेमुळं पुण्याच्या मुळशीतील घोटावडे फाटा ते हिंजवडी मार्गावरील, शेळकेवाडी जवळ रस्ता झाला जलमय 

परिसरातले पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून रस्त्यावर आल्याने, रस्त्याला ओढ्याचे स्वरूप 

यातून मार्ग काढताना वाहन चालकांना करावी लागली कसरत 

हिंजवडीकडे जाणाऱ्या नागरिकांचे यामुळं हाल

Jun 19, 2025 15:55 (IST)

नागोठणे शहरांमध्ये पुर परिस्थीती

नागोठणे एसटी स्टँड, बाजारपेठ  कोळीवाडा, अत्तर गल्ली  तसेच मस्जिद या सर्व परिसरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसत आहे.

Jun 19, 2025 15:37 (IST)

Rain News: नालासोपाऱ्यात मुसरधार पावसामुळे घराची भिंत कोसळली

वसई विरार शहरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नालासोपाराच्या बावसेतपाडा येथील घराची भिंत कोसळली आहेत.  सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरामधील साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून वसई विरार शहरातील ही चौथी दुर्घटना घडली आहे.  यामुळे शहरातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींचा तसेच घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Jun 19, 2025 15:34 (IST)

खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर

खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर

खेड शहराच्या बाजारपेठेत जगबुडी नदीचं पाणी शिरण्यास सुरुवात

सध्या नाना-नानी पार्क, मार्केट मार्केट परिसर, सुर्वे इंजिनिअरिंग, दापोली नाका रोड, गांधी चौक,  त्याचबरोबर भाजी मार्केटमध्ये देखील शिरलंय पुराचं पाणी 

काही व्यापा-यानी आधीच आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवला आहे

Jun 19, 2025 15:33 (IST)

गोदावरीच्या पाण्यात अडकली एक कार

नाशिकमध्ये आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून सकाळी साडेअकरा ते अडीच पर्यंत 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नागरिकांनी गोदकाठी लावलेली एक कार अडकली होती. 

Jun 19, 2025 15:28 (IST)

Live Update : खेडमध्ये वाडीमालदे गावाजवळील रस्त्यावर कोसळली दरड

खेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वाडीमालदे गावाजवळील रस्त्यावर आज दरड कोसळल्याची घटना घडली. आज सकाळी ही घटना घडली. त्यामुळे नांदिवलीहून खेडकडे जाणारी एसटी बस काही वेळ थांबली होती. मात्र गावकऱ्यांनी शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरून दरड हटवली आणि बसचा मार्ग मोकळा केला.

Jun 19, 2025 15:25 (IST)

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

 पावसाचा हवामान खात्याचा इशारा

काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

 काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता 

उत्तर रत्नागिरीत सकाळपासून आहे पावसाचा जोर

खेड, दापोली आणि मंडणगडमध्ये सकाळपासून आहे पावसाची संततधार

तर दक्षिण रत्नागिरीत पावसाची विश्रांती

Jun 19, 2025 15:25 (IST)

खेडच्या एकविरा चौकात शिरलं जगबुडीचं पाणी

खेडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड मच्छीमार्केट परिसरात जगबुडी नदीचे पाणी घुसलं आहे. तर एकविरा चौकात जगबुडी नदीचं आल्यामुळे खेड - दापोली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Jun 19, 2025 15:24 (IST)

मंडणगड - दापोली राज्यमार्गावर झाड पडल्याने वाहतूक झाली होती ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे मंडणगड - दापोली मार्गावर मोठे झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

काही वेळानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी च्या सहाय्याने झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. हा मार्ग दापोलीतून मंडणगड मार्गे मुंबई येथे जाणारा हा राज्यमार्ग आहे.  झाड पडून हा मार्ग वाहतुकीस बंद झाल्याने वाहनांची मात्र मोठी रांग लागली होती.

Jun 19, 2025 14:35 (IST)

Mumbai Rain: पुढील तीन ते चार तासात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे- मंत्रालय

Jun 19, 2025 14:05 (IST)

Live Update : मुंबई, पुणे, नाशिक, पालघर रेड अलर्ट...

मुंबई, पुणे, नाशिक, पालघर रेड अलर्ट...

Jun 19, 2025 13:41 (IST)

Live Update : भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन, काय आहे महत्त्वाच्या घोषणा?

Live Update : पुण्यातील मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर, घाट परिसर केला रिकामा  

Jun 19, 2025 12:37 (IST)

Live Update : पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस

पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस 

खडकवासला धरणातून सोडण्यात येणार 2000  क्युसेक पाणी

खडकवासला धरणातून मुळा मुठा नदीत करण्यात येणार 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग

धरण साखरी क्षेत्रात सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे पाण्याचा करण्यात येणार विसर्ग 

पुणे शहरातील भिडे पुलाला लागलं पाणी

Jun 19, 2025 12:37 (IST)

Live Update :ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा

ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा 

3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. हा इशारा 18-06-2025 रोजी सायंकाळी 17:30 वाजल्यापासून ते 19-06-2025 रोजी रात्री 23:30 वाजेपर्यंत लागू आहे.

या दरम्यान समुदामध्ये लहान बोटींना  समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.   किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः  थांबवण्याचाही ईशारा  देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

Jun 19, 2025 12:16 (IST)

Live Update : सुधाकर बडगुजरांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर

सुधाकर बडगुजरांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर 

* जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार कुंभमेळा आढावा बैठक

* भाजप आमदार सीमा हिरे आणि ईतर नाराज पदाधिकाऱ्यांच्या नाराजी बाबत गिरीश महाजन काय भूमिका घेणार ? हे बघणं महत्वाचे

 

* स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होणार ?

Jun 19, 2025 12:16 (IST)

Live Update : शिवसेना वर्धापन दिनी ठाकरे गटाला शिंदेंसेनेचा पुन्हा धक्का

शिवसेना वर्धापन दिनी ठाकरे गटाला शिंदेंसेनेचा पुन्हा धक्का

आज ठाकरे गटातील काही विभाग प्रमुख व माजी नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

थोड्याच वेळात ठाण्यातील कोरम माॅल येथील गंगुबाई शिंदे हॉल येथे पक्षप्रवेश सोहळा

कालच उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची घेतली होती बैठक

Jun 19, 2025 10:43 (IST)

Live Update : लोणवळ्यात तुफान पाऊस, 24 तासांत तब्बल 221 मिलिमीटर पावसाची नोंद

पर्यटननगरी असलेल्या लोणवळ्यात तुफान पाऊस झाला आहे, गेल्या 24 तासांत तब्बल 221 मिलिमीटर म्हणजेच 8.70 इंच पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत 323 मिलिमीटर पाऊस झाला होता. तर यंदा मात्र पावसाने इतकी जोरदार बॅटिंग केलीये की त्यामुळं आजच्या दिवसापर्यंत 1166 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Jun 19, 2025 09:20 (IST)

Live Update : ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी 

मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबचा लांब रांगा...

ठाणे -मुलुंड आनंदनगर जकात नाका टोल जवळ मोठ्या प्रमाणात वाहतुकी कोंडी .

वाहतूक कोंडी मुळे होत आहे वाहन चालका त्रास

Jun 19, 2025 07:26 (IST)

Live Update : मुंबईत पावसाची बॅटिंग सुरू

मुंबईत काल रात्री पासून पावसाची बॅटिंग 

सलग पावसाची संततधार कायम राहिली की त्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर होतो

मात्र अद्याप तरी रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झालेला दिसून आलेला नाही

रेल्वे वाहतूक सध्यातरी सुरळीत सुरु आहे

Jun 19, 2025 07:23 (IST)

Live Update : छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी काढली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आर्थिक जातीय भेदभावाची माहिती

छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी काढली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आर्थिक जातीय भेदभावाची माहिती

Anchor link- राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या महा ज्योती संस्थेला निधी देण्याबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे सातत्याने दुजाभाव करत असून सारथी संस्थेला मात्र भरभरून निधी दिला जातो, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश ससाने यांनी केला आहे. त्यांनी पुण्यातील पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे अनेक खुलासे केले.