12 minutes ago

आज महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभमेळ्यात शेवटचं महास्नान असून पहाटेपासून संगमावर स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी जमा झाली आहे. आज कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी वाढती गर्दी लक्षात घेता प्रयागराजमध्ये नो-व्हेइकल झोन ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज महाशिवरात्री असल्याने देशभरातील शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

Feb 26, 2025 19:33 (IST)

Hingoli News: आग्या मोहळच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे शेतात हरभरा काढणीच्या कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर आग्या मोहोळानी हल्ला केला आहे. आग्या मोहोळाच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भास्कर खिल्लारे या 43 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, दरम्यान आग्या मोहोळाच्या हल्ल्यात या शेतकऱ्याचे दोन मुले देखील जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत...

Feb 26, 2025 18:09 (IST)

Swarget News: अत्याचाराच्या घटनेनंतर मोठी कारवाई! 23 सुरक्षा कर्मचारी निलंबित

स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचाकरप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर स्वारगेट स्थानकातील 23 सुरक्षारक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. 

Feb 26, 2025 17:46 (IST)

Politics News: शिंदे गटात इनकमिंग जोरात, अपक्ष आमदार बांधणार शिवबंधन

जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवनेंचे अखेर ठरलं 

२८ फेब्रुवारी ला नारायणगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदेच्या उपस्थित करणार पक्ष प्रवेश 

शिंदे गटाच्या शिवसेनेत करणार जाहिर प्रवेश 

शरद सोनवने जुन्नर विधानसभा मतदार संघातुन अपक्ष आमदार म्हणुन निवडुन आले होते 

शिरुर लोकसभा मतदार संघाच्या बांधणीसाठी शिंदे गटाकडुन शरद सोनवने मैदानात 

शरद सोनवनेंची विधानसभा निवडणूक काळात शिंदे गटाच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती 

माजी खासदार शिवाजी आढळरावपाटलांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे गटात शिंदे चे नेतृत्व नव्हते 

आता आढळराव पाटलांची उणीव शरद सोनवने भरुन

Feb 26, 2025 16:25 (IST)

Pune News: अत्याचाराच्या घटनेवरुन संताप, वसंत मोरेंकडून स्वारगेट स्थानकात तोडफोड

स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या भयंकर घटनेवर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वागरेट स्थानकात येत आगारासह एसटी बसेसची तोडफोड केली आहे. 

Advertisement
Feb 26, 2025 15:45 (IST)

Vijay Wadettiwar: पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस

स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना – पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस!

स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

याहून धक्कादायक बाब म्हणजे  आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही!

महायुतीतील माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान शोधून काढणारे पुणे पोलिस आज पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी अजूनही जेरबंद करू शकत नाहीत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.

राज्याचे गृहखाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार ?

एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतक होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत?

Feb 26, 2025 11:46 (IST)

Live Update : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बससेवा चार दिवसानंतर सुरू

महाराष्ट्र-कर्नाटकमधील बससेवा चार दिवसानंतर सुरू

दोन्ही बाजूची आंतरराज्य बससेवा सुरू

तणावाच्या पार्श्वभूमीवर बस सेवा बंद करण्यात आली होती

प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता

कोगनोळी टोल नाक्यावरून बससेवा सुरळीत सुरू

Advertisement
Feb 26, 2025 11:02 (IST)

Live Update : मस्साजोग ग्रामस्थांच्या सातपैकी एक मागणी मान्य, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत दिली माहिती

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.  मस्साजोग ग्रामस्थांच्या सातपैकी एक मागणी मान्य करण्यात आली आहे. 

Feb 26, 2025 10:15 (IST)

Live Update : मसाजोगमधील अन्न त्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस

संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाबाबत देशमुख कुटुंबीयांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा तपास पुढे जात नसल्याने अखेर देशमुख कुटुंबीयांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. देशमुख कुटुंबीयांसोबत मस्साजोगचे नागरिक देखील या आंदोलनात सहभागी झाले. 

Advertisement
Feb 26, 2025 09:27 (IST)

Live Update : जेजुरीत आज महाशिवरात्रीनिमित्त गुप्त शिवलिंगाचे दर्शन

महाशिवरात्रीनिमित्त अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर दर्शनासाठी भाविक भक्तांनी पहाटे पासूनच गर्दी केली आहे. महाशिवरात्री मंदिराच्या शिखरातील गुप्त शिवलिंग भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.आजच्या दिवशी मंदिराच्या शिखरमध्ये असलेल्या गुप्त शिवलिंगाचे दर्शन घेता येते. मंदिरात असलेली ही गुप्त शिवलिंगे वर्षातून एकदाच भाविकांना दर्शनासाठी खुली केली जातात. त्यामुळे या वेळी दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरामध्ये विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. आज पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर हे भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुले करण्यात आले आहे.

Feb 26, 2025 08:29 (IST)

Live Update : नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई 

- भांगेच्या गोळया तयार करणाऱ्या उपनगर परिसरातील कारखान्यावर छापा

- भांग दळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन गिरण्या, गॅस शेगड्या, भांडे आणि ईतर साहित्य केले जप्त

- गोळ्यांच्या पॅकिंगला श्री KDM पुष्टी मेवावटी असे नाव देऊन केली जात होती विक्री

- दोन आरोपींसह 6 लाख 72 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

- भांगेच्या गोळ्या हा मादक पदार्थ असून खास करुन दुधात मिसळत केली जाते नशा

Feb 26, 2025 08:28 (IST)

Live Update : पुण्यातील नांदेड सिटी परिसरात पोलिसांकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त

पुण्यातील नांदेड सिटी परिसरात पोलिसांकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त

बेकादेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीला देखील पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रज्ज्वल भास्कर थोरात असं बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या अटक आरोपीचं नाव

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिसांनी आता त्याच्याकडूनच पिस्टल जप्त केल आहे

नांदेड सिटी पोलीस स्टेशनची कारवाई

Feb 26, 2025 08:27 (IST)

Live Update : महाशिवरात्रीनिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन

महाशिवरात्रीनिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन

संभाजीनगर: संपूर्ण देशात आज महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात असून भगवान शंकराची भाविक भक्त आस्थेने आराधना करत आहे. राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन भोलेनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. राज्याच्या प्रजेला सुखी आणि समृद्ध कर अशी प्रार्थना दानवे यांनी भगवान शंकराच्या चरणी केली.

Feb 26, 2025 07:36 (IST)

Live Update : महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी

आज महाशिवरात्री निमित्त मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात पहाटे पासून भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 3-4 किलोमीटर रांगा पाहायला मिळत आहे. पहाटेपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.