जाहिरात
24 minutes ago

आज महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभमेळ्यात शेवटचं महास्नान असून पहाटेपासून संगमावर स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी जमा झाली आहे. आज कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी वाढती गर्दी लक्षात घेता प्रयागराजमध्ये नो-व्हेइकल झोन ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज महाशिवरात्री असल्याने देशभरातील शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

Vijay Wadettiwar: पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस

स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना – पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस!

स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

याहून धक्कादायक बाब म्हणजे  आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही!

महायुतीतील माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान शोधून काढणारे पुणे पोलिस आज पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी अजूनही जेरबंद करू शकत नाहीत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.

राज्याचे गृहखाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार ?

एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतक होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत?

Live Update : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बससेवा चार दिवसानंतर सुरू

महाराष्ट्र-कर्नाटकमधील बससेवा चार दिवसानंतर सुरू

दोन्ही बाजूची आंतरराज्य बससेवा सुरू

तणावाच्या पार्श्वभूमीवर बस सेवा बंद करण्यात आली होती

प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता

कोगनोळी टोल नाक्यावरून बससेवा सुरळीत सुरू

Live Update : मस्साजोग ग्रामस्थांच्या सातपैकी एक मागणी मान्य, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत दिली माहिती

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.  मस्साजोग ग्रामस्थांच्या सातपैकी एक मागणी मान्य करण्यात आली आहे. 

Live Update : मसाजोगमधील अन्न त्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस

संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाबाबत देशमुख कुटुंबीयांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा तपास पुढे जात नसल्याने अखेर देशमुख कुटुंबीयांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. देशमुख कुटुंबीयांसोबत मस्साजोगचे नागरिक देखील या आंदोलनात सहभागी झाले. 

Live Update : जेजुरीत आज महाशिवरात्रीनिमित्त गुप्त शिवलिंगाचे दर्शन

महाशिवरात्रीनिमित्त अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर दर्शनासाठी भाविक भक्तांनी पहाटे पासूनच गर्दी केली आहे. महाशिवरात्री मंदिराच्या शिखरातील गुप्त शिवलिंग भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.आजच्या दिवशी मंदिराच्या शिखरमध्ये असलेल्या गुप्त शिवलिंगाचे दर्शन घेता येते. मंदिरात असलेली ही गुप्त शिवलिंगे वर्षातून एकदाच भाविकांना दर्शनासाठी खुली केली जातात. त्यामुळे या वेळी दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरामध्ये विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. आज पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर हे भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुले करण्यात आले आहे.

Live Update : नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई 

- भांगेच्या गोळया तयार करणाऱ्या उपनगर परिसरातील कारखान्यावर छापा

- भांग दळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन गिरण्या, गॅस शेगड्या, भांडे आणि ईतर साहित्य केले जप्त

- गोळ्यांच्या पॅकिंगला श्री KDM पुष्टी मेवावटी असे नाव देऊन केली जात होती विक्री

- दोन आरोपींसह 6 लाख 72 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

- भांगेच्या गोळ्या हा मादक पदार्थ असून खास करुन दुधात मिसळत केली जाते नशा

Live Update : पुण्यातील नांदेड सिटी परिसरात पोलिसांकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त

पुण्यातील नांदेड सिटी परिसरात पोलिसांकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त

बेकादेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीला देखील पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रज्ज्वल भास्कर थोरात असं बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या अटक आरोपीचं नाव

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिसांनी आता त्याच्याकडूनच पिस्टल जप्त केल आहे

नांदेड सिटी पोलीस स्टेशनची कारवाई

Live Update : महाशिवरात्रीनिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन

महाशिवरात्रीनिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन

संभाजीनगर: संपूर्ण देशात आज महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात असून भगवान शंकराची भाविक भक्त आस्थेने आराधना करत आहे. राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन भोलेनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. राज्याच्या प्रजेला सुखी आणि समृद्ध कर अशी प्रार्थना दानवे यांनी भगवान शंकराच्या चरणी केली.

Live Update : महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी

आज महाशिवरात्री निमित्त मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात पहाटे पासून भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 3-4 किलोमीटर रांगा पाहायला मिळत आहे. पहाटेपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.