Makar Sankranti do not eat rice : आज १४ जानेवारी २०२६ रोजी बुधवारी अत्यंत खास आणि दुर्लभ दिवस आहे. द्रिक पंचागानुसार, या दिवशी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी म्हणजेच षट्तिला एकादशी आहे. दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी तर काही पंचांगांनुसार रात्री ९ वाजून १९ मिनिटांवर ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. अशात आजच्या दिवशी मकर संक्रांती सुरू होईल. काही कथांनुसार, एकादशीच्या दिवशी भात खाणं वर्ज्य आहे. अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी खाण्याची परंपरा आहे. अशात या दिवशी तांदूळ दान करावे की नाही, खिचडी खाणे योग्य आहे की नाही याबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे.
ज्योतिषाचार्य काय सांगतात...
गोरखपूरचे पंडीत आणि ज्योतिषाचार्य सुजीत जी महाराज यांनी टाइम्स नाऊ हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, द्रिक पंचागांनुसार, सूर्याचे मकर राशीत संक्रमण दुपारी ३:१३ वाजता दिसून येत आहे. मात्र प्राचीन पंचांगानुसार, सूर्याचं संक्रमण दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी दिसत आहे. मात्र प्राचीन पंचांगानुसार, सूर्याचं संक्रमण रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी होईल. सूर्याचं मकर राशीतील संक्रमण रात्रीच्या वेळी होत असल्याने या दिवशी तांदूळ, खिचडी दान करणं किंवा खाणं शुभ मानलं जात नाही. १४ जानेवारीला माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची षट्तिला एकादशी आहे. त्यामुळे १४ जानेवारीला भात खाणं आणि तयार करणं शुभ मानलं जात नाही.
मकर संक्रांत आणि खिचडीचं महत्त्व...
मकर संक्रातीला खिचडी पर्वही म्हटलं जातं. या दिवशी तांदूळ आणि डाळ एकत्र करुन खिचडी तयार केली जाते आणि दानही करणं शुभ मानलं जातं. हा नवीन पिकांच्या पहिल्या कापणीचा उत्सव साजरा केला जातो आणि खिचडी ही ग्रहशांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रसाद म्हणून खाल्ली जाते.
एकादशीला भात आणि खिचडी खाण्याचा नियम काय आहे?
एकादशी व्रत विष्णू देवाला समर्पित आहे. या दिवशी अन्न (विशेषतः तांदूळ, गहू इत्यादी) खाणे, स्पर्श करणे किंवा दान करणे निषिद्ध आहे. काही आख्यायिका आणि प्रसिद्ध कथाकारांच्या मते, एकादशीला भात खाल्ल्याने उपवासाचे फायदे कमी होतात आणि पाप होऊ शकते. म्हणून, १४ जानेवारी रोजी तांदळाची खिचडी खाणे किंवा दान करणे निषिद्ध आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)