जाहिरात

Bank Holiday Today : आज 14 जानेवारीला बँक खुली असेल की बंद? तुमच्या शहरात मकर संक्रातीची सुट्टी कधी? पाहा यादी

Bank Holiday on January 14: मकर संक्रांत आणि पोंगलच्या मुहूर्तावर अनेक जण संभ्रमात आहेत की, बँकेची कामे आज उरकावीत की उद्या.

Bank Holiday Today : आज 14 जानेवारीला बँक खुली असेल की बंद? तुमच्या शहरात मकर संक्रातीची सुट्टी कधी? पाहा यादी
Bank holidays in January 2026

Makar Sankranti Bank Holiday 2026 : सकाळी उठून बँकेची कामं उरकून घेण्याचा विचार करणाऱ्या अनेकांमध्ये मकरसंक्रांत आणि पोंगलला बँका सुरू असतील की बंद याबाबत साशंकता आहे. मकर संक्रांत आणि पोंगलच्या मुहूर्तावर अनेक जण संभ्रमात आहेत की, बँकेची कामे आज उरकावीत की उद्या. कोणाला चेक जमा करायचा आहे, तर कोणाला रोखीचे व्यवहार करायचे आहेत. मात्र, सुट्टी १४ जानेवारीला आहे की १५ जानेवारीला, याबाबत लोकांमध्ये साशंकता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार तुमच्या शहरात बँक कधी बंद असेल, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

मकरसंक्रांत कधी आहे? तारखेबाबत गोंधळ का आहे? 

देशातील वेगवेगळ्या भागात मकर संक्रांत वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते. अनेक ठिकाणी याला उत्तरायण म्हटलं जातं. तर काही ठिकाणी पोंगल तर कुठे माघ बिहू. त्यामुळे प्रत्येक राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्टी नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला राज्यानुसार बँक हॉलिडेची यादी शेअर करतो. बँकेशी संबंधित काम करण्यासाठी शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी नक्की पाहा..

आज १४ जानेवारीला कुठे बँका बंद आहेत?

आज बुधवार १४ जानेवारी रोजी काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे. आरबीआयच्या यादीनुसार गुजरात, आसाम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये मकर संक्रांत आणि माघ बिहू निमित्त बँका बंद राहतील. 

उद्या १५ जानेवारीला कोणत्या राज्यांत सुट्टी असेल?

आज मुंबई आणि महाराष्ट्रातील बँका सुरू राहतील.  गुरुवार, १५ जानेवारी रोजी दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये बँका बंद राहतील. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये या दिवशी बँकांचे कामकाज होणार नाही.

डिजिटल सेवा सुरू राहतील -

बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ATM, UPI (Google Pay, PhonePe), नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग या सेवा २४ तास सुरू राहतील. त्यामुळे तातडीचे आर्थिक व्यवहार तुम्ही डिजिटल माध्यमातून पूर्ण करू शकता. 

PF मधून पैसे काढणं झालं सोपं; केव्हा, किती वेळेस 100 % पैसे काढू शकता? उपचार-लग्न-शिक्षणाचे नियम काय आहेत?

नक्की वाचा - PF मधून पैसे काढणं झालं सोपं; केव्हा, किती वेळेस 100 % पैसे काढू शकता? उपचार-लग्न-शिक्षणाचे नियम काय आहेत?

जानेवारी २०२६ मध्ये बँक कधी कधी बंद राहतील? 

१५ जानेवारी - मकरसंक्रांत, पोंगल आणि उत्तरायण पुण्यकालासाठी - तनिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना

१६ जानेवारी - कनुमा आणि तिरुवल्लुवर डेनिमित्ताने तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील बँकांमध्ये काम बंद राहील. 

१७ जानेवारी - तमिळनाडूमध्ये उझावर थिरुनलनिमित्ताने बँका बंद राहतील. या दिवशी दुसरा शनिवारी आहे. त्यामुळे या दिवशी ब्रँचेशी संबंधित कोणतेही काम होणार नाही. 

२३ जानेवारी - नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये बँकिंग सेवा बंद राहतील. 

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपूर्ण देशातील बँका बंद राहतील. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com