बांगलादेशात संयुक्त राष्ट्रांच्या फौजा उतरवा, मोदींनी हस्तक्षेप करावा; ममता बॅनर्जींची मागणी

पश्चिम बंगालमध्ये विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून यामध्ये बोलताना ममता यांनी मागणी केली की,  परराष्ट्रमंत्र्यांनी सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बांगलादेशातील स्थिती आणि तिथल्या भारतीय नागरिकांची परिस्थिती याबाबत निवेदन सादर करावे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

बांगलादेशात (Bangladesh Crisis) दिवसेंदिवस परिस्थिती बिकट बनत चालली आहे. हिंदू अल्पसंख्यांकांना बांगलादेशात सातत्याने लक्ष्य केले जात आहे. तिथल्या परिस्थितीबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राने सदर प्रश्नी लक्ष घालावे,आपल्या फौजा तिथे उतरवाव्यात अशी विनंती बॅनर्जी यांनी केली आहे. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या फौजा बांगलादेशात उतरवून तिथे शांतता प्रस्थापित केली जावी अशी मागणी बॅनर्जी यांनी केली आहे. याशिवाय पंतप्रधानांनी बांगलादेशातील पीडित भारतीयांची सुटका करावी आणि त्यांचे पुनर्सवन करावे अशीही मागणी ममता यांनी केली आहे. 

नक्की वाचा: दिल्लीत काँग्रेसचा हात सोडणं केजरीवालांसाठी फायद्याचं आहे का? 4 मुद्द्यांमध्ये समजून घ्या!

पश्चिम बंगालमध्ये विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून यामध्ये बोलताना ममता यांनी मागणी केली की,  परराष्ट्रमंत्र्यांनी सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बांगलादेशातील स्थिती आणि तिथल्या भारतीय नागरिकांची परिस्थिती याबाबत निवेदन सादर करावे. पंतप्रधान मोदी व्यस्त असतील तर किमान परराष्ट्रमंत्र्यांनी तरी बांगलादेशात काय सुरू आहे याबाबत देशाला अवगत करावे असे ममता यांनी म्हटले आहे. एका राज्याची प्रमुख म्हणून माझ्या काही मर्यादा आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने बांगलादेशातील स्थिती चिघळत चालली आहे त्यानंतर आपली चिंता वाढल्याचे ममता यांनी म्हटले. इस्कॉनच्या संबंधित व्यक्तींशी आणि बांगलादेशातील हिसाचाराने पोळलेल्या कुटुंबियांशी बोलणे झाल्यानंतर माझी चिंता वाढली असून त्यामुळेच मी हा मुद्दा उपस्थित करत असल्याचे ममता यांनी म्हटले आहे. 

Advertisement

नक्की वाचा : वॉकिंग न्युमोनिया ही काय भानगड आहे ?

ममता यांनी म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्र्यांनी बांगलादेशातील संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणी करावीत आणि संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या फौजा उतरवाव्यात. गरज पडल्यास  बांगलादेशातील बाधितांना आसरा देण्यासाठी पश्चिम बंगाल पुढाकार घेईल असेही ममता यांनी जाहीर केले आहे.  बांगलादेशातील या पीडितांना अन्नधान्याचा कोणताही तुटवडा आम्ही जाणवू देणार नाही असेही ममता म्हणाल्या. 

Advertisement

ममता 'हिंदू' शब्द विसरल्या का ?  भाजपचा सवाल

ममता यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले की, ममता यांनी बांगलादेशातील परिस्थितीबद्दल बोलताना 'हिंदू' शब्द वगळला आहे. मालवीय यांनी म्हटले की ममता यांचा CAA (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) ला विरोध असल्याने त्यांनी आपल्या विधानातून 'हिंदू' हा शब्द वगळला. हा कायदा बंगाली निर्वासितांची मदत करण्यासाठीच आणण्यात आला होता. ज्यातील बहुतांश हिंदू आहेत. मालवीय यांनी पुढे म्हटले की परदेशातील भारतीयांची काळजी घेणे हे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाही तर भारताचे कर्तव्य आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article