जाहिरात

वॉकिंग न्युमोनिया ही काय भानगड आहे ?

कोरोनानंतर समूह रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने लहान मुलांमध्ये याची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरे म्हणजे की कोरोनानंतर चाचण्या करण्याचे प्रमाण वाढल्याने या विषाणूने ग्रासलेल्या रुग्णांचे प्रमाणही कळू लागले आहे.

वॉकिंग न्युमोनिया ही काय भानगड आहे ?
मुंबई:

जगभरात लहान मुले मायकोप्लाझ्मा न्युमोनियाने बाधित होत आहे. एका विशिष्ट विषाणूमुळे याची लागण होते, ज्यामुळे लहान मुलांना कमी तीव्रतेच्या न्युमोनियाची बाधा होते. यालाच वॉकिंग न्युमोनिया असंही म्हणतात. या न्युमोनियामुळे बाधित होणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. खासकरून भारतामध्ये थंडीची लाट वाढू लागल्यानंतर आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात सर्दी-पडशाने ग्रासलेल्या मुलांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे दिसले होते. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची गरज  भासत नाही मात्र तीव्रता वाढल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. 

नक्की वाचा : नागा चैतन्य आणि शोभिताच्या प्री-वेडिंग सोहळ्यात समांताची एण्ट्री, PHOTOS सोशल मीडियावर व्हायरल

फक्त भारतातच नाही तर जगभरातील डॉक्टरांना 2023 नंतर वॉकिंग न्युमोनियाने ग्रासलेल्या मुलांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. हे विषाणू लहान मुलांना अधिक बाधित करत असले तरी तरुणांमध्ये आणि प्रौढांनाही या वॉकिंग न्युमोनियाची लागण झाल्याची काही उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. या विषाणूने ग्रासलेल्या काही प्रौढांना ब्रॉकायटीसचाही त्रास जाणवू लागल्याचे दिसून आले आहे.

नक्की वाचा : UPSC परीक्षेत अपयश, आईने घराबाहेर काढलं; वाचा AAP मध्ये प्रवेश केलेल्या अवध ओझाचा प्रवास

वॉकिंग न्युमोनियामुळे वर्षाकाठी 20 लाख मुलं, माणसे आजारी पडल्याचे निदर्शनास आले असल्याचे अमेरिकेच्या साथरोग प्रतिबंधक विभागाने ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.  नेदरलँडचे मेडिकल जर्नल 'युरो सर्व्हेलन्स'च्या जानेवारी महिन्यातील अंकात नेदरलँडच्या डॉक्टरांनी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की ऑक्टोबर 2023 पासून हे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की 2011 नंतर या विषाणूने बाधिक रुग्णांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हती.

नक्की वाचा : लोकसंख्येतील घसरणीची दक्षिण भारतीय राज्यांना काळजी का? आंध्रनंतर तेलंगणाही बदलणार कायदा !

कोरोनानंतर समूह रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने लहान मुलांमध्ये याची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरे म्हणजे की कोरोनानंतर चाचण्या करण्याचे प्रमाण वाढल्याने या विषाणूने ग्रासलेल्या रुग्णांचे प्रमाणही कळू लागले आहे. या दोन कारणांमुळे या विषाणूने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढली असल्याची शक्यता आहे. 

काही डॉक्टरांना असेही निदर्शनास आले आहे की वॉकिंग न्युमोनियाचे विषाणू ऑगमेंटींनसारख्या प्रतिजैविकांना जुमानत नाहीत. मात्र अझिथ्रोमायसिनसारख्या औषधांमुळे या रुग्णांना लवकर आराम पडू शकतो. अझिथ्रोमायसिन , एरिथ्रोमायसिन,मार्कोलिडससारखी औषधे लहान मुलांना सहसा दिली जात नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: