Crime News : संतापजनक! पत्नीचा प्रियकरासोबतचा हॉटेलमधील व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

मगनने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, त्याच्या पत्नीच्या प्रियकराला प्रमोशनसाठी 5 लाख रुपये हवे होते. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्यावर दबाव आणला. त्यानंतर मगनने कसेबसे 5 लाख रुपये पत्नीच्या खात्यात पाठवले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Crime News : एका महिलेने तिच्या प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि नंतर तो नवऱ्याला पाठवला. पत्नीचा प्रियकरासोबतचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील दोभ गावात ही घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी त्या तरुणाने 4 मिनिटे 2 सेकंदाचा व्हिडिओ बनवला आणि आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराला जबाबदार असल्याचे सांगितले. महिलेचा प्रियकर महाराष्ट्र पोलिसात कॉन्स्टेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 
आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने अनेक मोठी उघड केल्या. मगन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मगनने त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, त्याची पत्नी दिव्या आणि महाराष्ट्र पोलिसात तैनात असलेला तिचा प्रियकर दीपक त्याच्यावर दबाव आणत होते. दोघेही त्याच्याकडून वारंवार पैशांची मागणी करत होते. मगनने सांगितले की त्याच्या पत्नीने त्याला एक व्हिडिओ पाठवला आहे, ज्यामध्ये ती दीपकसोबत अश्लील नृत्य करत आहे. 

( नक्की वाचा : Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश )

मगनने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, त्याच्या पत्नीच्या प्रियकराला प्रमोशनसाठी 5 लाख रुपये हवे होते. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्यावर दबाव आणला. त्यानंतर मगनने कसेबसे 5 लाख रुपये पत्नीच्या खात्यात पाठवले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची पत्नी दिव्याने हे पैसे तिच्या प्रियकर दीपकच्या खात्यात ट्रान्सफर केले. मगनच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी, दिव्या आणि तिचा प्रियकर त्याला त्याच्या पालकांना मारून टाकून सर्व जमीन विकून मुंबईत दुसरी जमीन खरेदी करावी अशी मागणी करत होते. 

(नक्की वाचा - Love affair news: Facebook वर प्रेम जडलं, 12 वीच्या मुलासाठी नवऱ्याला सोडलं, प्रकरणाला असं वळण मिळालं की...)

मृत मगनने म्हटले आहे की, त्याच्या मृत्यूसाठी त्याची पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर जबाबदार आहेत. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर मुलांना त्यांच्या पालकांसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी. मृत युवक मगनने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, त्याची पत्नी दिव्या आधीच विवाहित होती. परंतु ही गोष्ट तिने लपवून ठेवली. आता तिचा प्रियकर दीपक, जो महाराष्ट्र पोलिसात कॉन्स्टेबल आहे, तो त्याच्या पत्नीला त्याच्यासोबत ठेवत आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article