मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. साहित्यिक, पत्रकार, क्रांतिकारक यांनी दिलेल्या लढ्यामुळे मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ‘27 फेब्रुवारी' रोजी ‘मराठी भाषा दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.
Shirur News आरोपी दत्तात्रय गाडे याचा ड्रोनमार्फत शोध सुरु
शिरूर तालुक्यातील गुणाट येथे आरोपी दत्तात्रय गाडे याचा ड्रोन कॅमेरा मार्फत शोध सुरू
शिरूर /पुणे
- स्वारगेट येथे 26 वर्षे तरुणीवर बलात्कार केलेला आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू
- आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसामध्ये लपून बसल्याची पोलिसांना खबऱ्याकडून माहिती
- पुणे शहर पोलिसांकडून ड्रोन द्वारे ऊस शेतीमध्ये शोध सुरू
- याच ठिकाणी असलेल्या घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आल्याची माहिती
Alibag Accident: अलिबागमध्ये बस अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू, संतप्त जमावाने बस फोडली
अलिबाग शहरात आज सकाळी एका दुचाकी चालकाला झालेल्या अपघातात,शालेय विद्यार्थीचा जागीच मृत्यू झाला. जयदीप शेखर बना असे मृत मुलाचे नाव आहे. दुचाकीवरून अलिबागेत येत असताना शहरातील बस स्थानका समोर मागून येणाऱ्या एसटीची त्याच्या दुचाकीला धडक बसली. पुढे अन्य एक एसटी ची गाडी होती.दोन गाड्यांमध्ये तो सापडल्याचे सांगण्यात येते...
अलिबाग नजीक वरसोली गावचा तो राहणारा होता. या अपघाता नंतर जमाव आक्रमक झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थीती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तरीही जमाव शांत होण्याच्या मानसिकते मध्ये नव्हता ...
सकाळी घडलेल्या या घटनेनंतरही दुपार पर्यंत जमावं शांत झाला नाही.शेवटी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली.
Pune News: आरोपीचे लोकेशन ट्रॅक, काही तासांमध्ये सापडेल: गृहराज्यमंत्री योगेश कदम
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याबाबत आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ही फिर्याद आली आणि अर्ध्या तासात शोध सुरू झाला. आरोपी अलर्ट होऊ नये म्हणून बातमी बाहेर नाही येऊ दिली, लोकेशन चेंज करण्याच प्रयत्न आरोपीकडून झाला असता म्हणून घटना बाहेर येऊ दिली नाही.. असं म्हणत आरोपीला ट्रॅक केलं जात आहे , तो काही तासांमध्ये सापडेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Live Update : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वारगेट बस स्थानकात दाखल
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वारगेट बस स्थानकात दाखल
Live Update : आष्टी येथील मुस्लीम कब्रस्तान साठी 1 कोटींचा निधी
वर्ध्याच्या आष्टी येथे वैशिष्ट्य पूर्ण निधीतून मुस्लीम कब्रस्तान साठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मुस्लीम बांधवांनी समाधान व्यक्त केले, आमदार सुमीत वानखडे यांनी हा निधी मंजूर करून आणत, मुस्लीम बांधवांच्या मागणीला साद दिली.
Live Update : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रमाचं आयोजन
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आज पुस्तक प्रदर्शन सोहळा पार पडणार आहे. सोबतच कविता वाचनाचा कार्यक्रम देखील करण्यात येणार आहे. अनेक दिग्गज कलाकार आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता विकी कौशल देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत
Live Update : मांडवी एक्स्प्रेसमधून 60 हजारांचे दागिने लंपास
मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेच्या गळ्यातील 60 हजार 400 रुपये किंमतीचे दागिने अनोळखी व्यक्तींनी लंपास केले. या प्रकरणी दोन अनोळखी महिलांवर खेड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत निशात अलिमुद्दीन कादिरी यांनी तक्रार नोंदवली आहे. एक्स्प्रेस खेड रेल्वेस्थानकात उभी असताना दोन अनोळखी महिलांनी फिर्यादी यांच्याशी संगनमताने भांडण करत दागिन्यांसह रोख ऐवजासह पोबारा केला. दागिने चोरीस गेल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर रेल्वेस्थानकात याची कल्पना दिली.
Live Update : इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरात दाखल..
इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरात दाखल..
- नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांच्या सोबत कोल्हापूर पोलीसाचा तपास सुरू..
- इंद्रजीत सावंत यांना नागपूर मधून कॉल केला होता का या संदर्भात तपास सुरू..
- कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकर यांच्या घरी देखील जाऊन तपासणी करण्याची शक्यता..
Live Update : कांदिवली पश्चिम लिंक लालजीपाडा परिसरात हॉटेलमध्ये भीषण आग
कांदिवली पश्चिम लिंक रोड येथील काल रात्री लालजीपाडा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये आग लागली होती
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल
आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे
सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवित हानी नाही