Margashirsha Purnima 2025 dos and don'ts: हिंदू धर्मातील मान्यतेनुसार प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा ही अत्यंत शुभे आणि लाभदायक मानली जाते. पौर्णिमेला केलेल्या व्रतवैकल्यांमुळे मोठं पुण्य मिळतं असं मानलं जातं. मार्गशीर्षातील पौर्णिमा ही देखील याला अपवाद नाही. 4 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा असून, आजच्याच दिवशी या वर्षातील शेवटचा सुपरमूनही आहे. (When is Margashirsha Purnima 2025?) म्हणजेच चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असणार आहे, ज्यामुळे तो मोठा आणि अधिक प्रकाशमान दिसणार आहे. यामुळे यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा ही अधिकच विशेष आहे. आजच्या दिवशी काही गोष्टी कटाक्षाने टाळणं गरजेचं आहे. 10 गोष्टी अशा आहेत, ज्या केल्यास तुमच्या पदरात पुण्य पडण्याऐवजी तुम्ही पापाचे धनी व्हाल.
नक्की वाचा: दत्त जयंतीची तारीख, पूजा, तिथी, शुभ मुहूर्त आणि उपवासाची महत्त्वाची माहिती
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला काय करू नये ?
- मार्गशीर्ष पौर्णिमेला जर तुम्ही गंगा स्नान करायचे ठरवले असेल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी स्नान करूनच बाहेर पडावे. कारण गंगा एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्राला जात असताना शुद्ध तन आणि मन दोन्ही गरजेचं असतं.
- मार्गशीर्षातील पौर्णिमेला पूजा करताना तुम्ही लावलेला दिवा तुमच्या स्वतःच्या किंवा इतर कोणाच्याही निष्काळजीपणामुळे विझणार नाही याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका.
- मार्गशीर्ष पौर्णिमेला पैसे दान करताना किंवा एखाद्या गरजूला जेवण देताना मनात कोणताही गर्व ठेवू नये, अन्यथा तुम्हाला दानाचे पुण्य मिळणार नाही.
- असं सांगितलं जातं की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. आजच्या दिवशी दिवसा झोपल्यास ते चांगलं नसतं.
- पौर्णिमेच्या दिवशी दाढी करण्यास मनाई आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी केस किंवा नखं कापू नये.
नक्की वाचा: अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! राजकारण्यांसह दिग्गज मंडळींनी दिल्या दत्त जयंतीच्या शुभेच्छा
- मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तामसी गोष्टींपासून दूर राहावे आणि या दिवशी चुकूनही मांसाहार, मद्यपान करू नये.
- पौर्णिमेच्या दिवशी कोणाशीही वाईट वर्तन करू नये. मन शांत ठेवावे आणि शक्य असल्यास जप करावा.
- मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे घालू नये, कारण त्याचा मनावर नकारात्मक परिणाम होतो.
- पौर्णिमेच्या दिवशी वाद घालणे किंवा भांडणे अत्यंत अशुभ मानले जाते.
- मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी कोणाची निंदानालस्ती करू नये. पौर्णिमेच्या दिवशी खोटे बोलू नये आणि कोणाची खिल्ली उडवू नये.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)