Datta Jayanti 2025 Date And Time : महाराष्ट्रासह देशभरात दत्त जयंतीचा (Dattatreya Jayanti 2025) उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. ब्रह्मा, विष्णू आणि शिवशंकर यांचे एकत्रित रूप म्हणजे दत्तगुरूंचा अवतार. त्यामुळे दत्तात्रेयांची पूजा केल्यास त्रिमूर्तींची पूजा केल्याचे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. यंदा दत्त जयंती (When Is Datta Jayanti 2025) कधी आहे, तिथी कालावधी, शुभ मुहूर्तासह अन्य माहिती जाणून घेऊया...
दत्तात्रेय जयंती 2025 तिथी कालावधी | Dattatreya Jayanti 2025 Tithi Time
- दत्तात्रेय जयंती 2025 तिथी प्रारंभ वेळ : 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8.37 वाजता
- दत्तात्रेय जयंती 2025 तिथी समाप्त वेळ : 5 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4.43 वाजता
तिथीनुसार यंदा 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाईल.
दत्त जयंती शुभ मुहूर्त | Datta Jayanti 2025 Shubh Muhurat
काही ठिकाणी दत्तजन्मोत्सव दुपारी 12.39 वाजता तर काही ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता साजरा केला जातो
श्रीकेतन कुलकर्णी गुरूजींनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
मार्गशीर्ष पौर्णिमेच्याच दिवशी दत्त जयंती का साजरी केली जाते?
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला होता, म्हणून याच तिथीला दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत असुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या, त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अपयश आले. तेव्हा ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार विविध ठिकाणी विविध रूपांत दत्तदेवतेला अवतार घ्यावा लागला. यानंतर दैत्यांचा खात्मा झाला, म्हणूनच हा दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो.
दत्त जयंतीचे महत्त्व | Datta Jayanti 2025 Importance
दत्त जयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असतात. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्त्वाचा अधिकाअधिक लाभ मिळण्यास मदत होते.
दत्त जयंतीचा उपवास कसा करावा?
- एकादशीप्रमाणे दत्त जयंतीचा उपवास करावा.
- फराळाचा नैवेद्य दत्तगुरुंना अर्पण करावा.
- दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्रातील अवर्तिनिका, चौथा अध्याय, दत्त जन्मोत्सव कथा वाचावी.
- दत्त महाराजांच्या "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या मंत्राचा जप करावा.
- दिवसभर नास्मरण करा.
- घराजवळील दत्त मंदिरात जावे, दत्तगुरुंना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.
- शक्य असल्यास औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालावी.
- उपवासाचे पारण दुसऱ्या दिवशी करावे.
दत्तगुरूंचा जन्मोत्सव कसा साजरा करावा? | Datta Jayanti 2025 Puja | Datta Jayanti 2025 Puja Kashi Karavi
दत्त जयंती साजरी करण्याशी संबंधित शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे, यालाच 'गुरुचरित्रसप्ताह' असे म्हणतात. दत्त मंदिरामध्ये भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. पण घरामध्ये दत्त जन्मोत्सव साजरा करावा.
- घरामध्ये चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरावे.
- चौरंगावर दत्तगुरूंची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी.
- षोडषोपचार पूजा करावी.
- दत्तांचा नामजप आणि प्रार्थना करावी.
- संध्याकाळी दत्त स्तोत्राचे पठण करावे.
- दत्त तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या रांगोळी काढा.
- दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप आणि आरती करून सुंठवड्याच्या प्रसादाचे वाटप करावे.
(नक्की वाचा: Datta Jayanti 2025 Wishes : त्रिमूर्तींचा आशीर्वाद मिळो! दत्त जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा)
श्री दत्त गुरूंबाबतची महत्त्वाची माहिती
- श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त असा जयघोष करत असतात.
- अवधूत हे दत्तात्रेयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय.
- दत्तांच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.
- शंख आणि चक्र भगवान विष्णूचे तर त्रिशूळ आणि डमरू शिवशंकराचे प्रतीक आहे.
- दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे.
- दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरू मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती.
- अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती.
- अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरू केले होते.
- महाराष्ट्रामध्ये औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवास विशेष महत्त्व असते.
श्री दत्तजन्म कथा नक्की वाचा:
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
