जाहिरात

Maruti Suzuki : मारुती सुझुकी कंपनीचा मोठा निर्णय; वर्क फ्रॉम होम, परदेश यात्रेबाबत महत्त्वाचं पाऊल

देशातील सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे.

Maruti Suzuki : मारुती सुझुकी कंपनीचा मोठा निर्णय; वर्क फ्रॉम होम, परदेश यात्रेबाबत महत्त्वाचं पाऊल

Maruti Suzuki Work From Home : देशातील सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनानंतर मारुतीने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट करीत याबाबत माहिती दिली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय, पश्चिम आशियात युद्धाचा दीर्घकालिन प्रभाव कमी करण्याची गरज लक्षात घेत अनेक पाऊलं उचलली आहेत. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम आणि परदेशी यात्रांवर निर्बंध यांचा समावेश आहे.

मारुती सुझुकीने सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलंय?

मारुती सुझुकीने शक्य त्या सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय परदेश यात्रांना मनाई करण्यात आली आहे. काटकसरीच्या धोरणाला मारुती सुझुकी कंपनीने पाठिंबा दर्शविला आहे.

याशिवाय मारुती सुझुकीने कर्मचाऱ्यांना काल पुलिंग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. सोबतच कार्यालय आणि घर दोन्ही ठिकाणी ऊर्जा संरक्षणावर जोर देत एअर कंडीशनर, पंखा आणि विजेच्या विवेकपूर्ण उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने सांगितले की, या सर्व उपाययोजनांची माहिती अंतर्गत कर्मचारी आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत व्यापकपणे पोहोचवली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com