Landslides in Wayanad : केरळच्या वायनाडमध्ये 'माळीण'ची पुनरावृत्ती, भूस्खलनामुळे 43 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक अडकल्याची भीती

Landslide in Wayanad : केरळच्या वायनाडमध्ये 'माळिण'ची पुनरावृत्ती झाली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 19 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Landslide in Wayanad

केरळच्या वायनाडमध्ये 'माळिण'ची पुनरावृत्ती झाली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 43 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 100 हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळतंय. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि वाचवण्यासाठी बचावकार्य राबवलं जात आहे. बचाव कार्यात अग्निशमन दल, NDRF आणि स्थानिक आपत्कालीन प्रतिसाद दलाचे जवळपास 250 जवान सहभागी आहेत. एनडीआरएफची अतिरिक्त टीम तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळली. यानंतर पहाटे 4.10 च्या सुमारास आणखी एक दरड कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. आपल्या X अकाऊंटवर त्यांनी म्हटलं की, 'वायनाडच्या काही भागात भूस्खलनामुळे मी व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांसोबत आम्ही आहेत आणि जखमींसाठी प्रार्थना करतो. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोलून तेथील सद्यस्थिती पाहता केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement