मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभ राजपूतच्या हत्या प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहे. सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी ही हत्या केली आहे. हत्येनतंर सौरभ आणि मुस्कान यांची सहा वर्षांची मुलगी 'पप्पा ड्रममध्ये आहेत' असं शेजाऱ्यांना सांगत होती. यावरून दिसून येते की मुलीला हत्येची आणि त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सौरभ आपल्या मुलीचा सहावा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टीवर आला होता. मात्र मुस्कान आणि तिच्या प्रियकराने त्याची 4 मार्च रोजी हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे 15 तुकडे केले आणि ओल्या सिमेंटखाली ड्रममध्ये पुरले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सौरभची आई काय म्हणाली?
सौरभची आई रेणू देवी यांनी याबाबत म्हटलं की, "मुस्कान आणि साहिलने 4 मार्च रोजी माझ्या मुलाची हत्या केली आणि ते फिरायला निघून गेले. घरमालकाने तिला घराचं काम करण्यासाठी खोली रिकामी करण्यास सांगितले होते. फिरून आल्यानंतर मुस्कानने खोली रिकामी करण्यासाठी मजूर पाठवले. मजुरांनी ड्रम उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तो ड्रम जड वाटला. त्यांनी तिला मुस्कान विचारले की त्यात काय आहे. तेव्हा तिने उत्तर दिले की त्यात सामान आहे."
(नक्की वाचा- सुंदर चेहऱ्यामागील क्रौर्याची कहाणी; पतीची हत्या करून मृतदेहाचे 15 तुकडे केले, शेवटी आखला प्लान)
रेणू देवी यांनी पुढे म्हटलं की, जेव्हा कामगारांनी ड्रमचे झाकण उघडले त्यांना दुर्गंधी आली. यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस येईपर्यंत मुस्कान तिच्या पालकांच्या घरी पोहोचली होती. रेणू देवी यांनी आरोप केला की मुस्कानचे पालक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या आईला गुन्ह्याबद्दल आधीच माहिती होती. त्यांनी वकिलाचा सल्ला घेतला असावा, म्हणून ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. मुस्कान आणि साहिलसह तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी रेणू देवी यांनी केली.
(नक्की वाचा- Meerut Crime : 'आमच्या लेकीला फाशीच द्या'; मेरठमध्ये जावयाच्या न्यायासाठी सासू-सासरे आले पुढे)
सौरभच्या सहा वर्षांच्या मुलीला त्याच्या मृत्यूबद्दल माहिती आहे का असे विचारले असता रेणू देवी यांनी म्हटलं की, "तिने काहीतरी पाहिले असेल. काही लोक म्हणाले की ती म्हणत होती 'पप्पा ड्रममध्ये आहेत'.
मुस्कानसाठी सौरभने नोकरी सोडली
मुस्कानचे सौरभच्या कुटुंबाशी असलेले संबंध सुरुवातीपासूनच तणावपूर्ण होते. दोघांनी 2016 मध्ये प्रेमविवाह केला होता. पत्नीसोबत जास्त वेळ घालवण्याची उत्सुकता असलेल्या सौरभने मर्चंट नेव्हीची नोकरी सोडली. यामुळे घरात भांडणे झाली आणि सौरभ आणि मुस्कान भाड्याच्या घरात राहायला गेले. सौरभच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की मुस्कानने पैशासाठी सौरभशी लग्न केले आणि त्याने तिच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला.
2019 मध्ये, मुस्कान आणि सौरभ यांना मुलगी झाली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. सौरभला कळले की मुस्कानचे त्याचा मित्र साहिलसोबत प्रेमसंबंध आहेत. यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. सौरभने घटस्फोट घेण्याचाही विचार केला. मात्र मुलीच्या भविष्याचा विचार करून त्याने माघार घेतली. त्याने मर्चंट नेव्हीमध्ये पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये, तो कामासाठी देश सोडून गेला होता.