
ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात एक मेसेज अनेकांच्या मोबाईलवर सध्या आला असेल. ड्रायव्हिंग लायसन्स आणि मोबाईल क्रमांक लिंक संदर्भातील हा मेसेज आहे. परिवहन विभागाच्या विविध सेवांसाठी मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वाहतूक विभागाने याबाबत नागरिकांना SMS द्वारे माहिती देणे सुरू केले आहे. हा बदल केवळ एक सामान्य सूचना नसून, वाहतूक सेवा अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरणामुळे (Aadhaar Authentication) युजर्सची ओळख व्हेरिफाय होईल.
रिअल-टाइम अपडेट्स
मोबाईल नंबर लिंक केल्यामुळे वाहन नोंदणी, दंड, नूतनीकरण आणि इतर परिवहन सेवांशी संबंधित माहिती रिअल-टाइममध्ये नागरिकांना थेट मोबाईलवर मिळेल. यामुळे सरकारी विभाग आणि नागरिक यांच्यातील संवाद सुधारेल. आधार प्रमाणीकरणामुळे ओळख पडताळणी सोपे होईल. हा निर्णय गैरवापर थांबवण्यासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. काही लोक दंड टाळण्यासाठी किंवा नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ओळख लपवण्यासाठी मोबाईल नंबर किंवा पत्ता बदलतात. आधार-आधारित पडताळणीमुळे ही समस्या दूर होईल.
(नक्की वाचा- PM Viksit Bharat Rojgar Yojana: 50 हजार पगार असेल तरी मिळतील 15000 रुपये, तरुणांसाठी सरकारची खास योजना)
मोबाईल नंबर कसा अपडेट कराल?
मंत्रालयाने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या अधिकृत वेबसाइटवर हे काम करू शकता. parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइट्सवरून जाऊन मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे. याशिवाय, 'वाहन' (Vaahan) आणि 'सारथी' (Sarathi) पोर्टलचाही वापर करता येऊ शकतो.
(नक्की वाचा- Free AI Courses : जगात बोलबाला असलेल्या क्षेत्रात करिअरची संधी; सरकारकडून 5 मोफत AI कोर्सेस)
मोबाईल नंबर कसा अपेडट कराल?
- अधिकृत पोर्टलवर जा.
- "Update Mobile Number via Aadhaar" हा पर्याय निवडा.
- तुमचा वाहन नोंदणी क्रमांक (Vehicle Registration Number) आणि चेसिस/इंजिन क्रमांक (Chassis/Engine Number) टाका.
- तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) टाकून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करा.
- माहितीची पुष्टी करा आणि सबमिट करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world