पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवरील तणाव कमी होण्याचे संकेत अद्याप दिसत नाहीत. वाढत्या तणावादरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांमुळे केंद्र सरकारने अनेक राज्यांना 7 मे रोजी 'मॉक ड्रिल' आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय युद्धकाळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्वत:ला वाचविण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 7 मे 2025 रोजी देशभरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येणार आहे. हा सराव 244 निवडक जिल्ह्यांमध्ये होईल. याचा उद्देश नागरी संरक्षणाची तयारी किती आहे हे पाहणं आणि ती सुधारणं आहे. यासाठी राज्या-राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांत गावोगावी सराव केला जाईल, जेणेकरून सगळ्यांची तयारी व्यवस्थित होईल.
22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा हकनाक बळी गेला. याच्यानंतरही पाकिस्तानच्या कुरघोडी सुरू आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून नागरिकांना सर्व तयारी ठेवण्यासाठी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी 1971 मध्ये अशा प्रकारची मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं.
नक्की वाचा - Caste census : जातीनिहाय जनगणना: काँग्रेसच्या अजेंड्यावर सर्जीकल स्ट्राईक !
महत्त्वाचे 6 मुद्दे...
- 7 मे रोजी 244 जिल्ह्यांमध्ये या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येईल. या मॉक ड्रिलचा उद्देश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील संरक्षण यंत्रणेची पडताळणी आहे.
- काही दुर्घटना घडल्यास 'ब्लॅकआउट' करण्यात येईल. नैसर्गिक संपत्ती आणि हेरिटेज स्ट्रक्चर असणाऱ्या इमारतींचे जतन करण्याचे निर्देश आहेत.
- युद्धकाळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायरन वाजवण्याचे आदेश
- तातडीने बचाव कार्य पूरवणे आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी याशिवाय राज्यांना एअर स्ट्राईकपासून बचावासाठी मॉकड्रिल करण्याच्या सूचना.
- हवाई हल्ल्याचे संकेत मिळत असल्यास, लोकांना सतर्क करण्यासाठी सायरन कार्यान्वित करण्याचे निर्देश आहेत.
- पाकिस्तान युद्ध करू शकतो, त्यामुळे भारत खबरदारी घेतली जात आहे. या मॉक ड्रिल दरम्यान संभाव्य चूका लक्षात घेत त्यात बदल करता येतील.