Modi Government : मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण, भाजप मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी; मुख्यमंत्रीही घेणार पत्रकार परिषद

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 11 वर्षात केलेल्या कामांची यादी  वाचून दाखविण्याची जबाबदारी भाजप नेत्यांवर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 11 वर्ष पूर्ण केले आहेत. 26 मे 2014 रोजी सुरू झालेल्या या प्रवासाला 11 वर्षे पूर्ण झाले आहेत. दरम्यान या निमित्ताने भाजप नेत्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे जनतेसाठी केलेली कामं भाजपा जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यासंदर्भात दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे मंत्री, राज्यमंत्री पत्रकार परिषद घेतील. यावेळी मंत्र्यांकडून मोदी सरकारने जनतेसाठी केलेल्या कामांची यादी वाचून दाखवणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - 'मला कुणी नापास करू शकत नाही, मीच एकनाथ शिंदेंना...', शिंदेंच्या मंत्र्याचा थेट इशारा, ठाकरेंचं ही नाव घेतलं

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 11 वर्षात केलेल्या कामांची यादी  वाचून दाखविण्याची जबाबदारी भाजप नेत्यांवर आली आहे. मोदी सरकारने महिला, दलित, आदिवासी, ओबीसी घटक यासाठी आवर्जून आणलेल्या विशेष योजनांची माहिती दिली जाणार आहे. 

Topics mentioned in this article