मोदी सरकारचा बजेटपूर्वी नितीशकुमारांना धक्का! सर्वात मोठी मागणी फेटाळली

मोदी सरकारनं बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमारांना (Bihar CM Nitish Kumar) धक्का दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Narendra Modi Nitish Kumar
नवी दिल्ली:

नरेंद्र मोदी सरकारच्या (PM Narendra Modi) तिसऱ्या राजवटीमधील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार आहे. या लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमत नाही. बिहारमधील जनता दल युनायटेड (JDU) आणि आंध्र प्रदेशातील तेलुगु देसम (TDP) या दोन पक्षांचा पाठिंबा मोदी सरकारसाठी निर्णायक आहे. या दोन्ही पक्षांना या पाठिंब्याची किंमत बजेटमध्ये मिळेल, असं मानलं जात होतं. पण, बजेटच्या एक दिवस आधी मोदी सरकारनं बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमारांना (Bihar CM Nitish Kumar) धक्का दिला आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सरकारनं जाहीर केला निर्णय

बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला जाऊ शकत नाही, हे केंद्र सरकारनं लोकसभेत स्पष्ट केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हे स्पष्टीकरण दिलं. बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा ही मागणी नितीश कुमार गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं करत आहेत. 

बिहारला विशेष राज्याचा दर्जा न देण्याचं कारण केंद्र सरकरनं यावेळी सांगितलं. राष्ट्रीय विकास परिषदेकडून (एनडीसी) यापूर्वी काही राज्यांना विशेष श्रेणीचा दर्जा दिला होता. त्या राज्यांची अनेक वैशिष्ट्य होती. 'डोंगराळ आणि कठीण भूभाग, लोकसंख्येची कमी घनता, आदिवासी समाजाची मोठी संख्या, शेजारच्या दिशेला लागून असलेलं भूराजनैतिक स्थान, आर्थिक आणि अवसंरचानात्मक मागसलेपण, राज्याच्या आर्थिक परिस्थितीची गैर-व्यवहार्य परिस्थिती याचा समावेश आहे.  

( नक्की वाचा : 'त्यांनी 2.5 तास पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला,' PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल )

या सर्व कारणांचा विचार करुन आणि राज्याच्या विशिष्ट स्थितीचा आधार घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बिहारला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याच्या मागणीवर एका आंतर-मंत्रालयी गटानं विचार केला होता. या गटानं 30 मार्च 2012 रोजी अहवाल सादर केला . त्या अहवालात देखील एनडीसीच्या अनेक निकषांच्या आधारानं बिहाराला विशेष दर्जा न देण्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.'

Advertisement

( नक्की वाचा : बिहारमध्ये किंग ते देशात किंगमेकर, कशी पलटवली नितीशकुमारांनी बाजी? )
 

RJD नं लगावला टोला

बिहारला विशेष राज्यचा दर्जा न मिळाल्यानं राष्ट्रीय जनता दल (RJD) यांनी नितीश कुमार यांना लक्ष्य केलं आहे. 'बिहारला नाही मिळणार विशेष राज्याचा दर्जा. संसदेत मोदी सरकार, नितीश कुमार यांनी JDU आता आरामात केंद्रातील सत्तेचा उपभोग घेत विशेष राज्याच्या दर्जावर राजकारण करत आहेत,' अशी टीका पक्षानं X वरुन केली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article