जाहिरात

दोन मुलांची आई पडली शेजारच्या तरुणीच्या प्रेमात, दोघी घरातून पळाल्या, शोधल्यानंतर पोलिसांना बसला धक्का

दोन मुलांची आई विवाहित महिलेच्या प्रेमात पडली आणि ती त्या मुलीसोबत पळून गेली असं समजलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

दोन मुलांची आई पडली शेजारच्या तरुणीच्या प्रेमात, दोघी घरातून पळाल्या, शोधल्यानंतर पोलिसांना बसला धक्का
मुंबई:

Madhya Pradesh News:  एखाद्या महिलेचं दुसऱ्या महिलेवर प्रेम झाल्याची प्रकरण अनेकदा समोर आली आहेत. पण दोन मुलांची आई विवाहित महिलेच्या प्रेमात पडली आणि ती त्या मुलीसोबत पळून गेली असं समजलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

ग्वाह्लेरमधील डबरामध्ये या अतरंगी प्रेमाची घटना घडली आहे. येथील पूजा जोशी (वय 28) ही दोन मुलांची आई शेजारची 24 वर्षांची मुलगी पूजा परिहारच्या प्रेमात पडली. त्या दोघी 1 एप्रिल रोजी एकत्र पळून गेला. दोन्ही कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर या घटनेचा तपास लागला. पोलिसांनी त्यांचा तपास केला असता त्या दोघी जयपूरमध्ये असल्याचं त्यांना समजलं. 

8 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

पूजाचं लग्न 8 वर्षांपूर्वी धर्मेंद्र जोशीशी झालं होतं. तिला दोन मुलं आहेत.  पूजा जोशी शेजारी राहणाऱ्या पूजा परिहारच्या प्रेमात कधी पडली हे कुणाला समजलंच नाही. दोघींच्या कुटुंबीयांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती. पोलिसांनी त्यांचं मोबाईल लोकेशन तपासलं त्यावेळी त्या जयपूरमध्ये असल्याचं त्यांना समजलं. 

कोट्यवधी संपत्तीच्या मालकीणीचा नाल्यामध्ये मृतदेह, नोजपिनमुळे सापडला सूत्रधार! वाचा कसा लागला छडा

( नक्की वाचा : कोट्यवधी संपत्तीच्या मालकीणीचा नाल्यामध्ये मृतदेह, नोजपिनमुळे सापडला सूत्रधार! वाचा कसा लागला छडा )

पोलीस अधिकारी यशवंय गोयल यांनी सांगितलं की, आमची टीम जयपूरला गेली तेव्हा पूजा जोशीनं एका मुलाचं रुप धारण घेतल्याचं आम्हाला आढळलं. पूजा परिहार महिला म्हणून राहात होती. या दोघींनाही एकत्र राहायचं होतं. पूजाचे नवरा आणि कुटुंबीयांनी तिला बरंच समजावलं. तिच्या मुलाची शपथ दिली. त्यावेळी मुलगा झालेल्या पूजानं दोघींनाही एकाच घरात राहू द्या अशी मागणी केली. पूजाचा नवरा धर्मेंद्रनं ती मागणी फेटाळली. मोठ्या प्रयत्नानंतर या दोघींना त्यांच्या कुटुंबीयांकडं सोपवण्यात आलं आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधिकारी निरंजन शर्मा यांनी दिली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: